प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

बोस्टन येथील एका अभ्यासक्रमात असे समोर आले आहे की, ज्या लोकांना आनुवांशिक रुपाने पहाटे लवकर उठायची सवय असते त्यांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहते. तसेच पहाटे लवकर उठल्यास  सिजोफेनिया (Schizophrenia) किंवा ताणतणाव (Depression)पासून दूर राहण्यास मदत होते. नेचर कम्युनिकेशन नावाच्या जर्नलमध्ये 'बॉडी क्लॉक' (Body Clock) नावाच्या मुद्दावर लिहिण्यात आले आहे. त्याध्येच पहाटे लवकर उठल्याचे कोणते फायदे होतात हे सुद्धा सांगण्यात आले आहे. तर जाणून घेऊया पहाटे लवकर उठल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात.

पहाटे लवकर उठण्याचे फायदे

-स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सिजन फुफ्फुसांना मिळते. ज्यामुळे श्वसनासंबंधित त्रास होण्याची शक्यता कमी होते. त्याचसोबत शरीरातील फुफ्फुसे उत्तम राहतात.

- व्यायाम केल्याने शरीरात रक्तसंचलन वाढते. त्यामुळे हृदयाची प्रक्रिया सुरळीत राहते. तर हृदयासंबंधित आजार होण्यापासून व्यक्ती दूर राहतात.

- दिवसभर उत्साहित वाटते. त्यामुळे कामात मन लागून राहण्यास मदत होते. कामावर चांगला प्रभाव पडचो आणि आनंद ही मिळतो.

पहाटे जबरदस्तीने उठू नका, आरोग्यावर होतील हे परिणाम

ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी (Oxford University) मधील वैज्ञानिक कॅथरिना वुल्फ यांच्या मतानुसार, जर एखादी व्यक्ती जबरदस्ती बॉडी क्लॉकच्या नुसार उलटे जाऊन पहाटे लवकर उठण्याचा प्रयत्न करत असेल, तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. आरोग्य आणि शरिरासोबत केलेली जबरदस्ती फायदेशीर नसते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या बॉडी क्लॉक नुसार दैनंदिन कामे करावीत. मात्र एखाद्याला खूप उशीरा पर्यंत रात्री जागे राहण्याची सवय असल्यास त्याला पहाटे लवकर उठवायचा प्रयत्न केल्यास ती व्यक्ती आळसावलेली दिसून येईल.

(सूचना: वरील माहिती ही एका अभ्यासक्रमातून पुढे आलेली आहे हे लक्षात ठेवावे. तसेच पहाटे उठण्याचे फायदे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. तरीही प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात पूरेशी झोप घेतल्यास आरोग्यास कोणतेही नुकसान होत नसल्याचे ही सांगितले जाते.)