H3N2 Experts Tips: इन्फ्लूएंझा ए उपप्रकार H3N2 विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. हा विषाणू संपूर्ण भारतामध्ये चिंतेचा विषय बनला आहे. परंतु, तज्ञांच्या मते, या विषाणूच्या प्रसाराचा बराचसा संबंध वातावरणातील प्रदूषणाशी आहे. कमी आर्द्रता आणि प्रदूषकांची उच्च सांद्रता यामुळे उच्च पातळीचे संक्रमण होत असल्याचे फोर्टिस हॉस्पिटल डायरेक्टर डॉ. अजय अग्रवाल यांनी सांगितलं आहे. तसेच वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिले आहे. याशिवाय आरोग्य तज्ञ धीरेन गुप्ता यांनी देखील H3N2 च्या वाढत्या प्रकरणांवर मत व्यक्त केले.
धीरेन गुप्ता यांनी सांगितले की, एडिनोव्हायरसचे 60 उपप्रकार आहेत, त्यापैकी 14 उपप्रकार गंभीर आहेत. याचा परिणाम लहान मुलांसोबतचं इतर लोकांवरही होत आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. या विषाणूमुळे गंभीर न्यूमोनियाचा धोका वाढला आहे. त्यामुळे आयसीयूमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. (हेही वाचा - H3N2 Virus: H3N2 मुळे वाढलं सरकारचं टेन्शन! पुद्दुचेरीमध्ये आढळले इन्फ्लुएंझाचे 79 रुग्ण; 'या' लोकांना सर्वाधिक धोका)
H3N2 ची लक्षणे -
- नाकातून पाणी येणे
- उच्च ताप
- सतत खोकला (प्रथम ओला मग कोरडा)
- छातीत रक्तसंचय
H3N2 चा संसर्ग रोखण्यासाठी 'हे' करा -
H3N2 व्हायरस टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या पावले उचलू शकता. यासाठी काही गोष्टी न करता काही गोष्टी करायला हव्यात.
H3N2 काय करावे?
- आपले हात वारंवार धुवा आणि सॅनिटायझर वापरा.
- तुमच्या आजूबाजूची जागा जसे की ऑफिस, शाळा, घर, गाडी इत्यादी स्वच्छ ठेवा.
- आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट करा. कारण, यामुळे
- तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.
- H3N2 विषाणूपासून तुमचे संरक्षण करू शकणारी फ्लूची लस घेत राहा.
- याशिवाय पाणी उकळून वाफ घ्या. त्यामुळे घश्याला आराम मिळेल.
- मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे घशाचा संसर्ग कमी होईल.
गुप्ता यांनी पुढे सांगितलं की, कोविडनंतर इन्फ्लूएंझासारखे आजार कमी होतील, अशी आमची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. मेटा-व्हायरस, राइनो व्हायरस, एडेनोव्हायरस, इन्फ्लुएंझा व्हायरस यांसारख्या विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. दुसरी असामान्य गोष्ट म्हणजे त्याचा परिणाम वरच्या श्वसनमार्गावर होतो. जसे की घसा, नाक आणि डोळ्यांमध्ये दीर्घकाळ जळजळ होणे. एडेनोव्हायरस आणि या विषाणूची लागण झालेल्या प्रकरणांची संख्या सामान्यतः 5% पेक्षा कमी असते, जी आता वाढली आहे. यामागची कारणे अद्याप शोधली जात आहेत.