नाकात बोट (Nose-Picking) घालणे ही एक अत्यंत साधी आणि सामान्य सवय वाटत असली तरी ती फार धोकायादयक आहे. कदाचित आपल्यापैकी अनेकांना हे पटणार नाही. पण संशोधकांनी केलेल्या संशोधनात खरोखरच ही बाब पुढे आली आहे. संशोधकांनी दावा केला आहे की, तुम्ही जर नाकात बोट घालण्याचा अतिरेक करत असाल तर, तुम्हाला अल्जायमर (Alzheimer's Disease) आजार होण्याची शक्यता कैक पटींनी बळावते. वाटले ना आश्चर्य? त्यामुळे जाणून घ्या खालील माहिती आणि वेळीच व्हा सावध.
संशोधकांच्या मते वारंवार नाकात बोट खातल्याने शरीराच्या खास करुन मेंदूकडे जाणाऱ्या नसा आणि पेशींचे नुकसान होते. त्यांना मोठ्या प्रमाणावर इजा होते परंतू त्यांना संसर्ग होण्याचीही शक्यता असते. परिणामी पुढे जाऊन हा संसर्ग वाढतो आणि संबंधित व्यक्तीला अल्जायमरसारख्या आजाराची लागण होते. यात स्मृतीभंश (Dementia) होण्याची शक्यता अधिक असते. एका संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Diabetes Before 40: तारुण्यात होणारा 'टाईप 2 मधुमेह', आढळणारी कारणे, लक्षणे त्यावरील प्रतिबंध; जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स)
क्लेम सेंटर फॉर न्यूरोबायोलॉजी आणि स्टेम सेल रिसर्च सेंटरचे संशोधन प्रमुख प्रोफेसर जेम्स सेंट जॉन यांनी नुकताच एक दावा केला आहे. या दाव्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी उंदरावर एक प्रयोग केला. या प्रयोगामध्ये आढळून आले की, ल्झायमर आणि स्मृतिभ्रंश होण्यास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया नाकाच्या नसेद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात. तशी लक्षणे उंदरामध्ये दिसून आली. सद्यास्थितीत हा आजार उंदरांमध्ये आढळत असला तरी लवकरच त्याबाबत मानवांवरही
TOI नं दिलेल्या वृत्तानुसार, क्लेम सेंटर फॉर न्यूरोबायोलॉजी आणि स्टेम सेल रिसर्च सेंटरचे संशोधन प्रमुख प्रोफेसर जेम्स सेंट जॉन यांनी सांगितलं की, हे संशोधन उंदरांवर करण्यात आलं होतं. संशोधनाअंती असं दिसून आलं की, अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश होण्यास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया नाकाच्या नसेद्वारे उंदरांच्या मेंदूपर्यंत पोहोचतात आणि नंतर अल्झायमरसारख्या आजाराची (Alzheimer's Disease Symptoms) लक्षणं त्यांच्यामध्ये दिसू लागतात.
क्लॅमिडीया न्यूमोनिया (Chlamydia Pneumoniae) नावाच्या बॅक्टेरिया अल्झायमरला (Alzheimer) कारणीभूत ठरतात. याच बॅक्टेरीयामुळे न्यूमोनिया आजाराचाही धोका वाढतो. हे जीवानून नाकातील नाजूक नसांद्वारे मज्जासंस्थेपर्यंत प्रवास करतात. त्या पेशींना हटविण्यासाठी मेंदू अमिलॉएड बीटा नावाचे प्रोटीन उत्पादीत करतात. हे प्रोटिनच अल्झायमर आजार बळवण्याचे प्रमुख कारण ठरते.