Night Shift मध्ये काम करतायत? 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी

आजकाल पुरुषांसह महिला सुद्धा नाइट शिफ्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. करियर मध्ये पुढे जाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी काही महिला हा पर्याय निवडत आहेत. मात्र दीर्घ काळ चालणाऱ्या नाइट शिफ्टमध्ये दैनंदिन कामांचे बारा वाजलेले असतात.

आरोग्य Chanda Mandavkar|
Night Shift मध्ये काम करतायत? 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

आजकाल पुरुषांसह महिला सुद्धा नाइट शिफ्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. करियर मध्ये पुढे जाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी काही महिला हा पर्याय निवडत आहेत. मात्र दीर्घ काळ चालणाऱ्या नाइट शिफ्टमध्ये दैनंदिन कामांचे बारा वाजलेले असतात. ऐवढेच नव्हे तर आरोग्यासह खाण्यापिण्यावर सुद्धा पुरेसा वेळ देणे कठीण होते. यामुळे थेट आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. अशातच आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवून आजारी पडू शकतो. मात्र नाइट शिफ्ट करत असाल तर तुमच्या दैनंदिन लाइफस्टाइलमध्ये काही बदल केल्यास नक्कीच त्याचा तुम्हाला आणि आरोग्याला फायदा होईल.

नाईट शिफ्टमध्ये काम करत असल्यास तुम्ही प्रथम पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. असे केल्यास तुम्ही नाईट शिफ्टमध्ये उत्तम पद्धतीने काम करु शकता. त्याचसोबत तुम्हाला कामादरम्यान झोप न येण्यासह चिडचिड सुद्धा होणार नाही. या व्यतिरिक्त एकाच वेळी भरपुर प्रमाणात खाण्यापेक्षा थोड्याथोड्या वेळाने खावे. खासकरुन हलक्या पद्धतीचे खाणे खा. महत्वाची बाब म्हणजे रात्रीच्या वेळी जंक फूड किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा.(Health Benefits Of Flax Seeds: रोज 1 चमचा अळशी खाल्ल्याने होतील 'हे' चमत्कारिक फायदे)

रात्रभर जागून काम करावे लागत असल्याने बहुतांश लोक खुप प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. याचा तुमच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतो. या व्यतिरिक्त पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यावर जोर द्या, शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. त्याचसोबत तुमच्या डाएटमध्ये फळ आणि सुकामेवाचा समावेश असू द्या. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी फळांचे सेवन करणे अतिशय फायदेशीर असते. यामुळे शरीरात उर्जा टिकून राहते.

जरी तुम्ही नाइट शिफ्टमध्ये काम करत असाल पण सकाळी सुद्धा तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर चिंता करु नका. पण वेळातवेळ काढून कमीतकमी 30 मिनिटे तरी व्यायाम, योगासन जरुर करा. कारण नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांची दिवस भरातील गोष्टी करण्याची उर्जा संपलेली असते. अशातच आरोग्य संबंधित समस्या उद्भवू नये म्हणून व्यायाम जरुर करा.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस