Health Benefits Of Flax Seeds: रोज 1 चमचा अळशी खाल्ल्याने होतील 'हे' चमत्कारिक फायदे
benefits of flaxseed ( Photo Credit - Pixabay)

आज आम्ही तुमच्यासाठी अळशींच्या बियांचे फायदे घेऊन आलो आहोत. त्यांचे नियमित सेवन केल्यास आपण बर्‍याच गंभीर आजारांना टाळू शकता. लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्यांसाठी अळशी  खूप फायदेशीर ठरू शकते, कारण अळशी वजन कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अळशीमध्ये आरोग्याचा खजिना लपलेला असतो. त्याचे सेवन आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांपासून वाचवू शकते. अळशीच्या बिया हृदयासाठीही फायदेशीर आहेत, परंतु जर आपण कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्येने ग्रस्त असाल तर अळशीच्या बिया सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (जाणून घेऊयात अळशीच्या बिया खाण्याचे फायदे. (Weight Loss Drink: वजन कमी करण्यासाठी प्या तुळस आणि ओव्याचे पाणी; असे होतील फायदे)

हृदयरोग कमी करण्यास उपयुक्त

अळशी अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. यात ओमेगा 3 फॅटी एसिड प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हेच कारण आहे की अळशी  पचन सुधारते.अळशी च्या बिया मधुमेह, कर्करोग आणि हृदय रोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.

रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास उपयुक्त

अळशी  कोलेस्ट्रॉलसाठी उपयुक्त आहेत. अभ्यासानुसार, अळशी रोज खाल्ल्याने तुमच्या कोलेस्ट्रॉल ची पातळी 6 ते 11 टक्क्यांनी कमी होऊ शकते. हे शक्य आहे, कारण त्यात फायबर आणि लिग्ननचे प्रमाण जास्त आहे.

पचनशक्ती सुधारते

अळशी चे नियमित सेवन केल्यास आपण पाचक शक्ती वाढवू शकता. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनशक्ती वाढवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

त्वचेसाठी फायदेशीर

अळशी मध्ये अँटी-ऑक्सीडंट्स आणि फाइटोकेमिकल गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा वयस्क न दिसता तरुण दिसते यामुळे सुरकुत्या पडत नाहीत आणि आपली त्वचा चमकत राहते.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)