नवरात्रोत्सव 2018 : अनवाणी चालण्याचे व्रत करताना 'अशी' घ्या पायांची काळजी !
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

नऊ रंगाची उधळण करत नवरात्रोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. या नऊ दिवसातच शक्तीचा जागर असतोच. पण दांडिया-गरबाची धूमही असते. त्याचबरोबर वत्रवैकल्यही असतात. मुंबईत या '5' ठिकाणी खरेदी करा ट्रेन्डी चनिया चोळी

नवरात्रोत्सवात अनवाणी चालण्याचं व्रत करण्याकडे तरुणाचाही कल वाढलेला दिसतो. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत नऊ दिवस अनवाणी चालणे त्रासदायक होऊ शकते.

पण या काही टिप्समुळे तुमचे अनवाणी चालण्याचे व्रत सुकर होण्यास नक्कीच मदत होईल. यंदा 'या' नऊ रंगांमध्ये साजरा करा नवरात्रोत्सवाचा सण !

# नऊ दिवस सतत अनवाणी चालण्याने पायांना त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी सकाळी पायाचे स्ट्रेचिंग एक्सरसाईज करावेत. त्यामुळे पायांच्या स्नायूनंवर अधिक ताण येणार नाही.

# अनवाणी खूप वेळ चालणे शक्यतो टाळावे. लांबचा प्रवास, दगदग टाळावी. आधीच उपवास त्यामुळे शरीरात ऊर्जा कमी असते. परिणामी थकवा वाढून अधिकच त्रास होण्याची संभावना असते. आरोग्याचं गणित सांभाळत नवरात्रीत उपवास कसा कराल ?

# अनवाणी चालताना खडबडीत रस्त्यांऐवजी सपाट रस्त्यांचा पर्याय निवडा. त्यामुळे पाय-टाचा दुखावणार नाहीत. तसेच ओलसर रस्त्यांवरुन चालणे शक्यतो टाळा. कारण इंफेक्शनचा धोका असतो.

# अनवाणी चालल्याने पाय, टाचा दुखावू लागल्यास कोमट पाण्यात जाडं मीठ घालून त्यात पाय बुडवून ठेवावेत. त्यामुळे पायांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. पोटऱ्या दुखत असल्यास तेलाने मसाज करा.

# बाहेरुन आल्यानंतर पाय स्वच्छ धुवून कोरडे करा. पायला जखम झाली असल्यास किंवा कट्स गेले असल्यास पाय अ‍ॅन्टिसेप्टीकयुक्त पाण्याने स्वच्छ धुवा. अन्यथा इंफेक्शन होवून त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे धूळ, चिखल, घाण यांपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.

# पायात वेदना जाणवत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी पायांना खोबरेल तेलाने मसाज करा.

या लोकांनी अनवाणी चालणे टाळावे

नवरात्रोत्सवात अनेक वर्ष नित्यनियमाने अनवाणी चालण्याचे व्रत तुम्ही करत असलात तरी तुम्हाला मधुमेह, अर्थाईटीस (सांधेदुखी) असलेल्या रुग्णांनी अनवाणी चालणे अगदी कटाक्षाने टाळावे.