नवरात्रोत्सव 2018 : मुंबईत या '5' ठिकाणी खरेदी करा ट्रेन्डी चनिया चोळी
नवरात्री सुरू होण्याआधीच चनिया चोळीची खरेदी करा... पहा मुंबईत कोणती ठिकाणं आहेत बेस्ट ?
मुंबई : 10 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये भाविक देवीच्या दर्शनाला जितक्या भक्तीभावांनी रांग लावतात तितकाच उत्साह मुला-मुलींना रात्री गरब्यामध्ये नाचण्यासाठी असतो. गरब्यामध्ये नाचताना पारंपारिक वेषातच नाचावं असा हट्टास असतो.
नवरात्रीमध्ये मुलांच्या विशिष्ट प्र्कारच्या जॅकेट्सचं, पारंपारिक पोषाखाचं आकर्षण असते त्याप्रमाणे मुलींचा ओढा प्रामुख्याने लेहंगा - चोली, चनिया चोळीकडे असतो. मग पहा यंदा नवरात्रीमध्ये नेमकी अशा पारंपारिक कपड्यांची खरेदी कुठे करू शकाल ?
1. भुलेश्वर -
भुलेश्वरमध्ये लेहंगा चोली आणि चनिया चोळीचे सारे प्रकार तुम्हांला पहायला मिळतील. हलक्या पॅचवर्कपासून ते अगदी आरसे आणि कवड्यांनी सजवलेली चनिया चोळी तुम्हांला भुलेश्वरच्या दुकानांमध्ये पहायला आणि विकत घ्यायला मिळेल. भुलेश्वरमध्ये एकाच ठिकाणी अनेक दुकानं असल्याने मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध असतील.
कसे जाल ? भुलेश्वरला जाण्यासाठी चर्निरोड स्टेशनवरून जाण्यासाठी 10-15 मिनिटांचा मार्ग आहे.
2. मालड -
मालडच्या नटराज मार्केटमध्ये पारंपारिक गुजराती आणि राजस्थानी पद्धतीचे कपडे, साड्या मिळतात नवरात्रीच्या दिवसांव्यतिरिक्तही मालडच्या नटराज मार्केटमध्ये भरजरी कपडे, उंची साड्या घेण्यासाठी गर्दी असते. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात हमखास पारंपारिक कपडे घेण्यासाठी अनेकजण एकदा नटराज मार्केटला अवश्य भेट देतात.
कसे जाल ? मालाडचं नटराज मार्केट हे अगदी स्टेशनच्या नजिक आहे. एकाच अनेक दुकान आहेत त्यामुळे पर्यायही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
3.विलेपार्ले -
मालाडप्रमाणे पश्चिम उपनगरांमध्ये विलेपार्लेचं मंगलम मार्केटही प्रसिद्ध आहे. नव्या, जुन्या स्टाईलच्या अनेक चनिया चोळी येथे मिळतात.
4. सायन -
सायन, किंग्स सर्कल भागामध्ये गांधी मार्केट लोकप्रिय आहे. विविध प्रकारचे पारंपारिक आणि भरजरी लेहंगा चोली, चनिया चोळी या मार्केटमध्ये मिळू शकतात. लहान मुलांपासून तरूणींपर्यंत अनेकींसाठी येथे हमखास पर्याय उपलब्ध आहेत.
कसे जाल ?
गांधी मार्केट हे किंग्स सर्कल स्टेशनपासून अगदी जवळ आहे. सायन किंवा माटूंगा स्टेशनवरून तुम्ही येणार असाल तर बस किंवा टॅक्सीने गांधी मार्केटपर्यंत पोहचू शकता.
5. दादर
दादर पश्चिमेला बाहेर उतरल्यानंतर खूप दुकानं आहेत. दादर पश्चिमेला असलेल्या मार्केटमध्ये चनिया चोळी मिळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2018 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

