फळे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हे प्राचीन काळापासून माणसाला ठाऊक आहे. त्यामुळे फळे हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात वरचेवर शैक्षणिक दर्जा व राहणीमान उंचावत असल्याने फळांना जास्त महत्व आलं आहे. तसेच प्रत्येक फळ एकाच ठिकाणी उत्पादित होत नसते, त्यामुळे उत्पादित होणार्या भागातून त्या फळाची वाहतूक उत्पादन नसणाऱ्या अन्यत्र ठिकाणी करणे क्रमापाप्त ठरते. साहजिकच त्यामुळे फळांची मागणी सुद्धा वाढते . मात्र मागणी प्रमाणे उत्पादन होईलच असे नाही. मात्र मागणी आहे तर पुरवठा झालाच पाहिजे व या परिस्थितीचा आर्थिक फायदा करवून घेतलाच पाहिजे हि सुद्धा मानवी मानसिकता वाढत चालली आहे.
आंबा, केळी यासारखी फळे पिकल्यावर खाणे पसंत केले जाते आणि शास्त्रीय दृष्ट्या तेच योग्य आहे. त्यासाठी निसर्गाने फळांना झाडावरच पिकण्याची सोय करून दिली आहे. मात्र फळ पिकल्यावर तोडलं तर त्याच्या नाजूकपणा मुळे फळांची वाहतूक शक्य होत नाही. त्यापेक्षा फळ कच्चं तोडलं तर दुहेरी फायदा होतो , तो म्हणजे कच्ची फळे कुठेही वाहून नेली जाऊ शकतात व कच्ची फळे तोडल्यामुळे झाड सुद्धा पुढील फळांसाठी तयार होते . म्हणजे कमी वेळात दोनदा फळे घेण शक्य आहे , हे व्यापारी व शेतकरी या दोघांनी बरोबर ओळखलं आहे.(झोपायच्या आधी पिस्ता खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? जाणून घ्या अधिक)
लोकांना तर पिकलेली फळे आवडतात? त्यासाठी लोकं त्या फळाचा रंग पाहतात, सुगंध घेतात. मग आपली कच्ची फळे कोण घेणार? इथ पर्यंत माणसाच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना आली, ती म्हणजे फळे अनैसर्गिकरीत्या म्हणजेच कृत्रिमरीत्या फळे पिकवणे.फळ जेव्हा झाडावर नैसर्गिक रित्या पिकलं जातं तेव्हा फळामध्ये 'इथिलीन' नावाचं रसायन निसर्गतः तयार होत असतं, आणि या इथिलीन मुळेच फळाचं आवरण व आतील भाग मऊ होऊन फळ पिकते व त्याला विशिष्ट चव व सुगंध येतो. मात्र फळ जेव्हा कच्च तोडलं जात तेव्हा इथिलीन निर्मिती होत नाही आणि फळ पिकू शकत नाही. यावर उपाय म्हणून फळ विविध कृत्रिम रसायनांनी पिकवले जातात, त्यापैकी एक म्हणजे कॅल्शियम कार्बाईड.
>कॅल्शिअम कार्बाईड चे आरोग्यावर परिणाम-फळ कच्चे तोडल्याने त्याला आवश्यक अन्नपुरवठा होत नाही तसेच इथिलीन निर्मिती सुद्धा होत नाही त्यामुळे फळातील विविध नैसर्गिक जैवरासायनिक प्रक्रिया मंदावतात. अश्यावेळी ऍसिटीलीन फवारले तर ऍसिटीलीन व इथिलीन चे गुणधर्म सारखे असल्याने फळ गोंधळते. त्यामुळे फळ फक्त वरून पिवळ दिसत असलं तरी ते आतून कच्च असते. अश्या फळांना अजिबात सुगंध येत नाही तसेच त्यांची चव पार बिघडते. शिवाय फळांचं आयुष्य कमी होतं. ऍसिटीलीन मुळे फळातील जीवनसत्वाचं व सूक्ष्म अन्नद्रव्यांच विघटन होते.
-अशी फळे खाल्य्याने पोट बिघडणे, डायरिया, तोंडाला फोड येणे, पोटदुखी, डोकेदुखी सारखे तात्पुरते लक्षणं दिसतात जे आपण कधीही फळांमुळे झाल्याचे मनावर घेत नाही. मात्र बरीच लक्षणे अशी आहेत कि जि ताबडतोब दिसत नाही मात्र शरीरात घुसखोरी व लढाया सुरुच असतात, आणि कालांतराने कर्करोग, सतत झोपाळूपणा, त्वचेचे आजार, कमी रक्तदाब, स्मृतीभंश, हातापायाला लकवा जाणे व मज्जासंस्थेशी संबधित आजार होतात.