सायकल | प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit - Pixabay)

प्रदूषणापासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असो किंवा स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी असो, सायकल चालवणे (Cycling) हा नेहमीच सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे तुमच्या पायांचे स्नायू मजबूत होतात. यासोबतच फॅट बर्निंगही सहज होते. सायकलिंगमुळे हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते आणि मानसिक ताकदही वाढते. परंतु तुम्हाला माहित आहे का की सायकल चालवल्याने पुरुषांमध्ये नपुंसकत्वाचा (Infertility) धोकाही वाढू शकतो.

पोलंडमधील व्रोकला मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये (Wroclaw Medical University) नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, सायकलच्या सीटवर सतत बसल्याने पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट सुन्न होतात आणि त्यामुळे प्रायव्हेट पार्टच्या धमन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. संशोधनात असे आढळून आले आहे की, जे पुरुष आठवड्यातून 3 तासांपेक्षा जास्त सायकल चालवतात त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक आढळून आली आहे.

अशा परिस्थितीत, संशोधनात असे सुचवण्यात आले आहे की इरेक्टाइल डिसफंक्शन टाळण्यासाठी पुरुषांनी सायकल चालवताना दर 10 मिनिटांनी सीटवरून उठून पॅडलवर उभे राहावे. जास्त वेळ सीटवर बसून राहणे किंवा चुकीच्या पद्धतीने सायकल चालवणे यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनसोबत नपुंसकत्वाचा धोका वाढू शकतो. इरेक्टाइल डिसफंक्शनमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. यामध्ये प्रायव्हेट पार्ट आकसले जातात  आणि मज्जातंतूंवर खूप परिणाम होतो.

सायकल चालवताना सीटवर सतत बसल्यामुळे प्रायव्हेट पार्ट आणि गुदद्वारावर खूप दाब येतो आणि त्यामुळे नसा खराब होतात आणि हळूहळू रक्तप्रवाह कमी होऊ लागतो. त्यामुळे प्रायव्हेट पार्ट बधीर होऊन त्यात मुंग्या येणेही सुरू होते. जेव्हा ही समस्या वारंवार उद्भवते, तेव्हा तिचे रूपांतर इरेक्टाइल डिसफंक्शनमध्ये होते, ज्याला सामान्यतः नपुंसकत्व म्हणतात. (हेही वाचा:  ट्रांसजेंडर लोकांसाठी खूशखबर! लिंगबदल शस्त्रक्रिया, दिल्लीत फुकटात होणार बाईचा पुरुष, पुरुषाची बाई)

दरम्यान, पुरुषांमध्ये नपुंसकत्वाचा धोका केवळ सायकलिंगमुळेच नाही तर अनेक कारणांमुळे वाढू शकतो. यामध्ये मधुमेह, हृदय समस्या, तंबाखू सेवन, लठ्ठपणा, प्रोस्टेट शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, चिंता, नैराश्य आणि इतरही अनेक कारणे समाविष्ट आहेत.