Free Sex Reassignment Surgery:  ट्रांसजेंडर लोकांसाठी खूशखबर! लिंगबदल शस्त्रक्रिया, दिल्लीत फुकटात होणार बाईचा पुरुष, पुरुषाची बाई
LGBTQ | | Representational Image (Photo Credits: Pixabay)

निसर्गाने दिलेल्या शरीराविरुद्ध भिन्नलिंगी भावना असणाऱ्या स्त्री-पुरुषासाठी महत्त्वाची माहिती आहे. ज्या व्यक्तींना ट्रान्सजेंडर व्हावे वाटते किंवा लिंगबदल शस्त्रक्रिया करुन घ्यावीशी वाटते अशा मंडळींसाठी खुशखबर आहे. साधारण 10 ते 15 लाख रुपये खर्च येणारी ही सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी (Free Sex Reassignment Surgery) म्हणजेच एसआरएस (SRS) आता मोफत करता येणार आहे. होय, तुम्ही जे वाचले ते बरोबर वाचले आहे. आता लिंगबदल शस्त्रक्रिया करुन कोणत्याही व्यक्तीस आपला मूळ देह सोडून आपल्या आवडीने स्त्री किंवा पुरुषाचा देह धारण करता येणार नाही.

अत्यंत महागड्या शस्त्रक्रियांपैकी एक म्हणून लिंगबदल शस्त्रक्रियेचा उल्लेख केला जातो. हिच शस्त्रक्रिया आता दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये अगदी मोफत करता येणार आहे. त्यामुळे स्त्रीचा पुरुष किंवा पुरुषाची बाई आता अगदी फुकटात होता येणार आहे. (हेही वाचा, Love Story: मास्तरीनबाईंनी विद्यार्थीनीशीच केले लग्न, लिंगाचेही विघ्न केले दूर; नवदाम्पत्य सुखात, घ्या जाणून)

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवला यांनी याबाबत नुकतेच एक परिपत्रक राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला पाठवले होते. या पत्रकात म्हटले होते की, रुग्णालयात बर्न आणि प्लास्टिक वॉर्ड असतो आणि रुग्णालयांकडे प्लास्टिक सर्जनही उपलब्ध असतात. त्यामुळे रुग्णालयांनी मोफत SRS सर्जरी करावी.

आयोगाने हा निर्णय म्हणजे एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत अशा प्रकारची सुविधा निर्माण व्हावी यासाठी पाठिमागील अनेक काळापासून प्रयत्न सुरु होते. आमच्या हस्तक्षेपानंतर दिल्लीत अशी सेवा सुरु झाल्याचा आम्हाला आनंद असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी म्हटले आहे. खासगी रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी 10 ते 15 लाख रुपयांचा खर्च येतो. अनेक ट्रान्सजेंडर लोक हा खर्च पेलू शकत नाहीत.

दरम्यान, परिपत्रकातील सूचनांचे योग्य रितीने पालन व्हावे. जर एखाद्या ट्रान्सजेंडर व्यक्तीस काही समस्या, अडचण असेल तर ते 181 क्रमांकावर फोन करु शकतात असेही स्वाती मालिवाल यांनी म्हटले आहे.