Health Benefits of Jamun: मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी आहे जांभूळ, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
Jamun (Photo Credits: Facebook)

उन्हाळा म्हणजे फळांचा मोसम. यात आंबा, कलिंगड, द्राक्षं या फळांसोबत आणखी एका फळाचे नाव आर्वजून घेतले जाते म्हणजे जांभूळ (Jamun). गावाकडे हे फळ खूप सर्रासपणे दिसतात. शहरी भागात जांभळाचे झाड फार क्वचित पाहायला मिळते. चवीला हे फळ गोड-खारट-तुरट जरी असले तरी याचे फायदे खूपच गुणकारी आहेत. जांभूळ हे फळ अनेकांना खायला आवडते. हे फळ आयुर्वेदात फार महत्त्वाचे आहेत. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांवर हे फळ फायदेशीर आहेत.

मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. सुगंधी पाने आणि गुणकारी बीज, फळे, फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधने तयार केला जात असे.

पाहूयात जांभूळ खाण्याचे फायदे

1. रक्तदाब

रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब 34.6% नी कमी होतो. Summer Health Tips: उन्हाळ्यात चिकू खाण्याचे 'हे आश्चर्यजनक फायदे तुम्हाला माहित आहे का?

2. मधुमेह

जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. त्यात असलेल्या alkaloids केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते.

3. पोटांचे विकार

पचन संस्था सुरळीत करण्यासाठी आणि अनेक पोटांच्या विकारांवर जांभूळ उपयुक्त ठरते. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून 2-3 वेळा घ्या.

हेदेखील वाचा- Health Tips: फणसाचे गरे खाल्ल्याने शरीरास होणारे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

4. त्वचाविकार

त्वचेसंबंधीचे आजार असल्यास जांभळाचा ज्यूस करून प्यायल्यास त्वचेसाठी गुणकारी ठरते.

5. हृदयविकार

जांभळात मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असल्यामुळे हृदयविकारावर जांभूळ फायदेशीर ठरते.

जांभूळ डिटॉक्सिफिकेशन मध्ये मदत करते आणि इम्यून सिस्टिमचे कार्य सुरळीत करते. त्यामुळे शरीरास उपयुक्त असणा-या या फळाचे सेवन अवश्य करावे.