Summer Health Tips: उन्हाळ्यात चिकू खाण्याचे 'हे आश्चर्यजनक फायदे तुम्हाला माहित आहे का?
Chikoo (Photo Credits: Wikimedia Commons)

उन्हाळ्यात (Summer) तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवायला लागतो. अशा वेळी लोकांना गारेगार काकडी, कलिंगड, संत्री, खरबूज यांसारखे फळे खावीशी वाटतात. यात भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे यामुळे शरीराला थंडावा मिळतो. मात्र तुम्हाला माहित आहे या फळांसोबत आणखी एक उन्हाळ्यात खाल्यास तुमच्या शरीरास आरोग्यदायी फायदे होतात ते फळ म्हणजे 'चिकू'(Chikoo). हे फळ थंड आणि भरपूर चविष्ट असे फळ आहे. या फळामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्याचे याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकारचा उत्साह तसेच ऊर्जा मिळते. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची शक्ती वाढते. Summer Health Tips: खरबूज खाल्ल्याने उन्हाळ्यात 'या' आजारांपासून स्वत:ला दूर ठेवण्यास होईल मदत

उन्हाळ्यात चिकूचे सेवन केल्याने शरीरास होणारे फायदे:

1. चिकूमध्ये 71 टक्के पाणी. 1.5 टक्के प्रोटीन आणि 25.5 टक्के कार्बोहायड्रेट असते. यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात तर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते.

2. हाडांसाठी चिकू खूप फायदेशीर आहे. चिकूमध्ये फॉस्फरस आणि आयर्नचे अतिरिक्त प्रमाण असते, जे हाडांसाठी खूप आवश्यक आहे. Summer Health Tips: उन्हाळ्यात लिंबू सरबत प्यायलाने शरीरास होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे तुम्हाला माहित आहे का?

3. चिकूमध्ये ग्लुकोजची मात्राही चांगली असते. जे लोक जास्त काम करतात त्यांना ऊर्जेची जास्त आवश्यता असते. उन्हाळ्यात उकाड्यामुळे थकवा जाणवतो. अशा वेळी चिकू खाणे शरीरास फायदेशीर ठरते. Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?

4. चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. चिकूच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते.

5. चिकूमधील पॉलिफेनॉलिक या घटकामुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब अशा आजारात आराम मिळतो.

शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यामध्ये अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुण पॉलिफेनॉलिक अँटीऑक्सिडन्ट घटक आहे. जे शरीरातील विषाणू नष्ट करण्यास मदत करतात.