Lemon Juice (Photo Credits: PixaBay)

अंगाची लाही लाही करणा-या उन्हाळ्यात उकाड्यामुळे घसा कोरडा पडतो. अशा वेळी ही कोरड घालवण्यासाठी, आलेला थकवा दूर करण्यासाठी गारेगार असे लिंबू-पाणी प्यावे असे वाटते. उन्हाळ्यात लिंबूपाणी पिणे हे अनेक त्रासांवर रामबाण उपाय ठरु शकते. उन्हाळ्यात आलेला थकवा, अशक्तपणा घालवण्यासाठी लिंबूपाणी (Lime Juice) फायदेशीर ठरु शकते. लिंबूपाण्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि पोटही साफ होते. नुसता लिंबू खाणे आपल्या दातांच्या इनॅमलला (आवरण) हानिकारक ठरू शकते म्हणून लिंबूरस डायरेक्ट न पिता त्यामध्ये कोमट पाणी मिसळून पिणे योग्य ठरेल.

उन्हाळ्यात लिंबू-पाणी प्यायल्याने न केवळ थकवा दूर होतो तर स्थूलपणा कमी होण्यासही मदत होते. उन्हाळ्यास रोज सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने पोटही साफ होते.  Summer Health Tips: उन्हाळ्यात बनवा पुदिन्यापासून बनवलेले 'हे' पेय आणि सन स्ट्रोक पासून करा स्वत:चा बचाव

लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

  • लिंबात असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच त्वेचवरील डाग दूर करण्यासही मदत होते.
  • दुपारी जेवणानंतर लिंबूपाणी प्यायल्यास खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.
  • लिंबू पाण्यामुळे तोंडाला येणारा वास निघून जातो. Health Tips: द्राक्ष खाल्ल्यामुळे होणारे 'हे' फायदे ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्

  • वजन नियंत्रणात आणण्यासाठी रोज सकाळी उठून लिंबूपाणी पिणे फायद्याचे ठरते.
  • उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.
  • उन्हाळ्यात उकाड्यामुळे अनेकांनी चक्कर आल्यासारखे वाटते. अशा वेळी त्या व्यक्तीस ग्लासात लिंबू पाणी प्यायला दिल्यास त्या व्यक्तीला बरे वाटेल.
  • रोज लिंबू सरबत घेतल्याने आरोग्य सुधारते त्याचबरोबर मुतखडा होणे हे विकार हि दूर होतात.लिंबूसरबतामुळे शरीर हायट्रेड होण्यास मदत होते. त्यामुळे युरिन ब्लॉक होणे हा त्रास कमी होतो.
  • मधुमेहाचा त्रास असणा-या व्यक्तींनी साखर न घालता लिंबू-पाणी प्यावे. हे शरीरासाठी गुणकारी ठरते.

लिंबू-पाणी शरीरात ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे असे लिंबूपाणी पिणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आणि हितवर्धक असते.