Mint juice (Photo Credits: PixaBay)

शरीराला थंडावा देणारी औषधी वनस्पती म्हणजे पुदिना (Mint). आपली पाचक शक्ती वाढविण्यास, पोटाचे विकार बरे होण्यास पुदिना खूप गुणकारी ठरतो. अशा या पुदिन्याचा उन्हाळ्यात वापर करणे खूप फायदेशीर ठरते. पुदिना खाल्ल्यास आपल्या तोंडाला येणारी दुर्गंधीही दूर होते. पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल (चरबी ) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात, तसेच याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात. उलटी, अपचन, गजकर्ण यासंराख्या अनेक आजारांवर गुणकारी ठरणा-या पुदिन्यामुळे सनस्ट्रोकपासूनही बचाव होऊ शकतो. पण त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीनेच पेय बनविणे गरजेचे आहे.

अनेकांना हॉटेलमध्ये गेल्यावर Virgin Mojito पिण्याची सवय असते. पुदिन्यापासून बनवलेल्या या पेयामुळे अन्नाचे पचन चांगले होते. मात्र असे पेय आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. उन्हाळ्यात सनस्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी तुम्ही पुढे सांगितलेले पेय पिणे गरजेचे आहे.

हेदेखील वाचा- Summer Health Tips: उन्हाळ्यात चहा बनविण्याची 'ही' आहे योग्य पद्धत

कसे बनवाल हे पेय:

काही पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा आणि ते पाणी गार झाल्यावर प्या, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल.

त्याचप्रमाणे कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसा सोबत मिसळून प्यायल्याने देखील आराम मिळतो. महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिवसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)