उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्यामुळे भयंकर उकाडा जाणवतो. अशा वेळी आपल्याला काही थंड, गारेगार असे सरबत वा द्रव्ये पदार्थ प्यावीत असे वाटते. मात्र ज्यांना चहा पिण्याची सवय असते त्यांना ऋतू कोणताही असो पण चहा काही सुटत नाही. पण तुम्हाला माहित आहे उन्हाळ्यात गरमागरम चहा वा दुधाचा चहा पिणे शरीरास घातक असते. म्हणून उन्हाळ्यात आपला रोजचा चहा पिण्याऐवजी हर्बल पद्धतीने बनवलेला चहा पिणे कधीही चांगले. अनेकांना याची योग्य पद्धत माहिती नसेल. ज्यांना उन्हाळ्यात चहा पिणे सुटत नाही अशा लोकांनी या हर्बल चहाचे सेवन करावे. त्यासाठी चहा पावडर ऐवजी तुळस, पुदिन्याचा वापर करावा.
पुदिना आणि तुळस हे थंड वनस्पती आहेत. याचे सेवन केल्याने शरीरास थंडावा मिळतो. त्यामुळे यापासून बनविलेला हर्बल चहा उन्हाळ्यात पिणे शरीरास लाभदायक असते. Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?
कसा बनवाल तुळस आणि पुदिन्यापासून बनविलेला चहा?
1. तुळशीचा चहा
तुलसीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. तुळसीमध्ये सुद्धा एंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात आसते. तुळसी ची चहा बनवण्यासाठी एक पॅन मध्ये एक कप पाणी घ्या आणि ते चांगले उकळेपर्यंत गरम करा. उबळ आल्यावर पॅनचे आचे काढून त्यात 6-7 तुळशीची पाने व्यवस्थित धुऊन घाला. 2 मिनिटे झाकून ठेवून नंतर चहा गाळून प्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचे रस आणि एक चमच मध घाला. हा चहा आपल्या पोट, डोळे, यकृत, लिव्हर आणि हृदयसाठी खूप फायदेशीर आहे.
2. पुदीन्याचा चहा
उकळत्या पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे पुदीन्याची पाने घाला. 15 मिनिटे ते उकळण्यासाठी ठेवा. त्यांनंतर ते मिश्रण गाळून प्या. गोड हवे असल्यास चहामध्ये एक चमच मध घाला. पुदीन्यामध्ये विटामिन ए, मॅग्नीशियम, फॉलेट आणि आयरन भरपूर असतात.
तुळस आणि पुदिना या दोन्ही नैसर्गिक नवस्पती असल्यामुळे याचा शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय या वनस्पतींचा वापर आयुर्वेदातही केला जातो. उन्हाळ्यात अशा पद्धतीने बनवलेला चहा प्यायल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम होणार नाही आणि तुमची चहा पिण्याची सवयही मोडणार नाही.