Jackfruit (Photo Credits: Pixabay)

उन्हाळ्यात आंब्यासह आणखी एका फळाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात ते फळ म्हणजे 'फणस' (jackfruit). वरून काटेरी दिसणारा फणस आतून खूपच गोड आणि रसाळ असतो. उन्हाळ्यात फणसाचा मोसम असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फणस उपलब्ध होतो. फणसाच्या प्रामुख्याने दोन प्रकार आहे कापा आणि बरका. यातील कापा फणस हा बरक्या पेक्षा कमी गोड असतो मात्र कापायला सोपा असतो. याउलट बरका फणस हा खूप रसाळ आणि गोड असतो. बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात. याशिवाय विलायती, सकल्या, नीर आणि डगूळ अशा देखील फणसाच्या जाती आहेत. फणसाकडे आपण एक गोड फण म्हणून बघतो पण तुम्हाला माहित आहे हा फणस खाल्ल्याने शरीरास खूप चांगले आणि आरोग्यदायी फायदे होतात.

फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे.

फणसाचे गरे खाल्ल्याने शरीरास होतात हे फायदे

1. फणसात मोठ्या प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.

2. भरपूर प्रमाणात लोह असल्याने अॅनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं. फणस खाल्ल्याने शरीरातील लोहाचं प्रमाण वाढतं. इतकंच नाही तर शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं आणि अॅनिमियासारखे विकार होत नाहीत. Summer Health Tips: खरबूज खाल्ल्याने उन्हाळ्यात 'या' आजारांपासून स्वत:ला दूर ठेवण्यास होईल मदत

3. थायरॉइडचा त्रास असणाऱ्या लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉइड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

4. हाडांसाठी फणसाचे गरे खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शिअम हाडांसाठी गुणकारी असते.Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?

5. फणसात असलेले विटॅमीन ए आणि सी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका यामुळे कमी होऊ शकतो.

फणसाचे गरे खाल्ल्याने त्वचेस आणि डोळ्यासही फायदेशीर ठरते.फणसाचे सेवन केल्यामुळे अल्सर आणि पचनाच्या सर्व समस्या दूर होतात. फणसाच्या पानापासून बनलेल्या चुरणाचा सर्वाधिक फायदा होतो.