यंदा वातावरणीय बदलामुळे पाऊस बराच लांबला होता, त्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने हिवाळा (Winter) थोडा उशिरा सुरु झाला. आता कुठे थंडीची जाणीव होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये लोक गुलाबी थंडीचा आस्वाद घेताना दिसून इतर आहेत. मात्र तुम्हाला हे माहित आहे की, वातावरणीत बदलानंतर थंडीचा प्रभाव सर्वात आधी होतो तो आपल्या त्वचेवर. म्हणजे त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, त्वचा लाला होणे अशा गोष्टी सुरु होतात. यासर्वांवर वेळीच उपाययोजना केली नाही, तर त्वचेचे फार नुकसान होऊ शकते.
सर्वात महत्वाचे म्हणजे थंडीमध्ये जी त्वचा कोरडी पडते ते टाळणे गरजेचे आहे. यासाठी छोटे आणि साधे उपाय आहे त्यांनी फरक पडू शकतो
> अंघोळ करताना, शक्यतो साबणाचा वापर टाळा शॉवर जेल वापरा. अंघोळ केल्यावर त्वरित त्वचेवर मोश्चरायजर लावा.
> अंघोळीनंतर त्वचेला टॉवेलने रगडू नये, तर फक्त टॅप करत अंग कोरडे करावे.
> त्वचेमध्ये स्निग्धता टिकून राहील असा फेसवॉश वापरा. यासाठी तुम्ही ‘क्लिंजर’चाही वापर करू शकता.
> ‘स्क्रब’ क्रिमचा वापर टाळावा तसेच, ‘हिटर’मुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे याबाबत अधिक काळजी घ्यावी. (हेही वाचा: अकाली सुरुकुत्यांनी त्रस्त? या उपायांनी दूर करा वृद्धत्वाच्या खुणा आणि मिळवा नितळ त्वचा)
> अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, हिवाळ्यामध्ये अतिनील किरणे जास्त प्रमाणात सक्रिय असतात. यामुळे बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे.
> गजकर्ण व सोरायसिस आजार किंवा त्वचेची अॅलर्जी असलेल्या लोकांनी याकाळात विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही समस्येसाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
> ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठांसाठी व्हॅसलिन, लिप बाम, लोणी, किंवा तुपाचा वापर नियमित करा.
> थंडीमध्ये शक्यतो घट्ट कपडे वापरणे टाळा. या काळात सुटू कपड्यांचा जास्त वापर करा.
(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)