सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच लोकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. व्यस्त जीवनशैली, अयोग्य खाणे, कमी झोप यांमुळे अकाली वृद्धत्व आल्यासारखे वाटते. त्यात चेहऱ्यावरील सुरुकुत्या (Wrinkle) तर पदोपदी याची जाणीव करून देतात. वय जसे जसे वाढू लागते तस तसे सुरुकुत्याही वाढतात, यामुळे इतर लोक आपल्या वयाच्या अंदाज लावू शकतात अशी भीतीही वाटते. म्हणून आज आम्ही अकाली येणाऱ्या सुरुकुत्या कमी करण्याचे उपाय सांगत आहोत.
रेटीन – अ क्रीम - या क्रीम मध्ये रेटीनोइड्स असतात, जे त्वचेखाली कोलेजनचे प्रमाण वाढवतात यामुळे त्वचा मुलायम राहते. या क्रीममुळे सुरुकुत्यांचे प्रमाण बरेच मी होते.
चेहऱ्याचे व्यायाम - बोटाने तुमच्या भुवयांच्या वरच्या बाजूस मध्यभागी अलगद दाब देऊन वर ओढा. दोन्ही हाताची 4 बोटे भुवयांच्या वरच्या बाजूस ठेवून ते वरती तुमच्या हेअरलाईन पर्यंत ओढा. धनुष्याच्या आकारात तुमच्या भुवया 10 सेकंद धरून ठेवा. शिवाय चेहऱ्याच्या मसाजनेही सुरकुत्या जाण्यास मदत होते.
नारळ – अर्धा कप नारळाचे दुध कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा, सुकल्यानंतर धुवून टाका.
बटाटा – बटाट्याचा रस 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा, सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
केळी आणि मध – पिकलेल्या कुस्करून घेतलेल्या केळामध्ये मध, गुलाबजल आणि दही घाला. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.
सनस्क्रीन – घराबाहेर पडण्यापूर्वी UVA आणि UVB प्रोटेक्शन देणारे आणि SPF जास्त असणारे सनस्क्रीन लावा. (हेही वाचा: जोडीदाराला Sex मध्ये संतुष्ट ठेवायचे आहे? शिघ्रपतनाची समस्या टाळण्यासाठी करा हे उपाय)
आले - आल्याचा रस कोमट करून रात्री झोपताना चेहर्यावर लावावा. सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा नितळ होते.
प्रदूषण, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन हे काही सुरुकुत्या येण्याची कारणे आहेत. त्यामुळे या सर्व उपायांसोबत आपली जीवनशैली बदला. शक्य असल्यास योग, योग्य आहार, आठवड्यातून चार दिवस व्यायाम, शांत झोप, दररोज 4-5 लिटर पाणी पिणे या गोष्टी फॉलो करण्यास सुरुवात करा.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)