जोडीदाराला Sex मध्ये संतुष्ट ठेवायचे आहे? शिघ्रपतनाची समस्या टाळण्यासाठी करा हे उपाय
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

शीघ्रपतन (Premature Ejaculation) ही पुरुषांमधील एक सर्वसामान्य समस्या आहे. या कारणामुळे अनेक जोडप्यांमधील लैंगिक जीवनात तणावही निर्माण होतो. मात्र याबद्दल बाऊ करण्यापेक्षा ती गोष्ट समजून घेऊन त्यावर काही उपाय करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा हे समस्या आपल्या मानसिक स्थितीशी निगडीत असते. अशात पती-पत्नी वेगवेगळया औषधांचा आधार घेतात, पण अनेकांना याचाही फायदा होताना दिसत नाही. पुरुषाच्या इंद्रिय-ताठरपणा प्रसंगी कमीजास्त होऊ शकतो. अतिकष्ट, थकवा, रात्रपाळी, जागरणे, व्यायामाचा अभाव, अशक्तपणा, आजारातून उठलेले असणे, इत्यादी कारणांनी ताठपणा कमी होतो. योग्य आहार, विश्रांती, करमणूक, व्यायाम, इत्यादी उपायांनी अशा बहुतेक सर्व समस्या आपोआप सुटतात. मात्र यासोबत स्वतः केलेले काही उपायही फायद्याचे ठरू शकतात.

  • प्रत्येक पुरुषाला वीर्यस्खलन होण्याआधी ठराविक संवेदना होत असतात, या संवेदना ओळखून वीर्यस्खलन थांबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास वीर्यपतन लांबवता येऊ शकते.
  • एका संभोगानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करताना शिश्नामध्ये ताठरता निर्माण होत नाही, अशावेळी पुरुषांना संभोगाआधी काही तास हस्तमैथून करण्याचा सल्ला काही डॉक्टर देतात.
  • शीघ्रपतनाचा संबंध, व्यक्तीच्या स्वभावात खोलवर भिनलेली अधिरता, उतावळेपणा व घाई याच्याशी असतो. त्यामुळे सेक्स सुरु करताना आधी फोरप्ले करा, त्यानंतर संभोगाकडे वळा.
  • निरोध वापरून संवेदनशीलता कमी होते म्हणून काहीजण डबल निरोध वापरून संभोगाचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे संभोगाचा कालावधी वाढू शकतो. पण लिंगाची संवेदनशीलता कमी होते. (हेही वाचा: पहिल्यांदा सेक्स करताय? पार्टनरशी बोलण्यापासून ते कंडोम तयार ठेवण्यापर्यंत अशी घ्या काळजी)
  • रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा आल्याची पेस्ट मधासोबत घ्या. आल्याच्या सेवनाने शरीरात उष्मा निर्माण होतो.
  • शतावरी, अश्वगंधा आणि गोखरू 100-100 ग्रॅम घेऊन त्यःची बारीक पूड करा. ही पूड एक चमचा मधासोबत खा, त्यानंतर एक ग्लास  थंड पाणी प्या. सकाळी अनुशापोटी हा उपाय करा.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)