पहिल्यांदा सेक्स करताय? पार्टनरशी बोलण्यापासून ते कंडोम तयार ठेवण्यापर्यंत अशी घ्या काळजी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Dangerr)

पहिल्या सेक्स (Sex)चा अनुभव हा अतिशय खास आणि अविस्मरणीय असतो. प्रत्येकालाच पहिला सेक्स हा एक आठवण म्हणून आयुष्यभर लक्षात राहतो. पहिल्यांदा सेक्स करताना जोडप्यांमधले अवघडलेपण, भीती किंवा बुजरेपणा यांमुळे परिस्थिती बिघडू शकते. यासाठी आधी दोघांची सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचा विचार व्हायला पाहिजे. प्रत्येकालाच पार्टनरसोबत पहिल्यांदा संबंध प्रस्थापित करताना अवघडल्यासारखे वाटते. या बाबतील काही लोक रोमँटिक असतात आणि पार्टनरच्या जवळ जाण्यासाठी जास्त वेळ घेत नाहीत परंतु काही जणांना यामध्ये सहजपणे पुढाकार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आज आम्ही पहिल्यांदा सेक्स करताना नक्की काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स देणार आहोत

> सेक्सच्या आधी रूममधील वातावरण रोमँटिक करा. लाइट रोमँटिक म्युझिक रूममधील वातावरण आल्हाददायक बनवण्यात मदत करेल. या व्यतिरिक्त तुम्ही अॅरोमा कँडलचा वापर करू शकता. यामुळे रूम सुगंधित होईल.

> पहिल्यांदा सेक्स करताना आपल्या पार्टनरचे मोकळ्या मनाने भरभरून कौतुक करा. पार्टनरचा ड्रेस, हेअर स्‍टाइल, बोलण्याची स्‍टाइल, मेकअप इ. गोष्टींचे कौतुक केल्याने पार्टनर स्वतःहून तुमच्या जवळ येईल.

> सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी दोघांमध्ये संवाद होणे फार गरजेचे आहे. सेक्स करण्याआधी कम्फर्टेबल होण्यासाठी फोरप्ले करा. पार्टनरच्या त्या ठराविक जागा शिधून काढा जिथे स्पर्श केल्याने पार्टनर सुखावेल. (हेही वाचा: भरपूर सेक्स करूनही का राहतात स्त्रिया असंतुष्ट? कदाचित पुरुषांकडून होत असतील ‘या’ चुका)

> पहिल्यांदा सेक्स करताना सुरक्षादेखील महत्त्वाची आहे. लैंगिक आजार किंवा अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते, म्हणूनच कंडोम जरूर बाळगा.

> पहिल्यांदा सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धर नका. तुम्हाला आनंद मिळणे आणि छान वाटणे जास्त महत्त्वाचे आहे.

> पहिल्यांदा सेक्स करताना पॉर्न फिल्म्समध्ये दाखवतात तशा पोझिशन्स ट्राय करू नका. सर्वात आधी तुमचा पार्टनर कोणत्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल आहे ते पहा.

> काही वेळेस पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होण्याची शक्यता असते.दर पाच पैकी एका स्त्रीला असा त्रास होतोच. बर्‍याचदा शुष्क योनीमार्गामुळे हा त्रास होऊ शकतो म्हणूनच योग्य से लुब्रीकेशन वापरा.

पहिल्यांदा सेक्स करताना शीघ्रपतनाची किंवा शिश्नाची ताठरता न राहण्याची समस्या उद्भवू शकते.मात्र हळूहळू योनी व शिश्न यांचा संबंध वाढला की,शीघ्रपतनाची समस्या कमी होते. तुमच्या जोडीदाराला सेक्स करताना त्रास होत असेल, वेदना होत असेल किंवा रक्त आले तर ताबडतोब सेक्स थांबवावा. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.