थंडीच्या सीझनला (Winter 2019) सुरुवात होताच अनेक जण आपल्या पायांचे रक्षण करण्यासाठी शूज/ बूट किंवा पूर्ण कव्हर असणाऱ्या चप्पलांचा वापर करताना आढळून येतात, या प्रकारच्या चपल्लांमध्ये कोणत्याही बाजूने हवा खेळती राहण्यास जागा नसल्याने अनेकदा शु बाईट (Shoe Bite) सारखी समस्या उध्दभवते. इतकेच नव्हे तर काहींना कोणतीही नवीन चप्पल विकत घेतली की पहिले काही दिवस वापरताना हा त्रास काही चुकत नाही. शु बाईट मध्ये थोडक्यात तुमच्या पायांपेक्षा चप्पल आकाराने मोठी किंवा लहान असल्यास पाय आणि चप्पलेच्या कडांमध्ये घर्षण होऊन त्वचा खरचटणे, साल निघणे, रक्त येणे किंवा फोड येणे असा त्रास होतो. बऱ्याच वेळा हा प्रकार टाचेला, पायाच्या पाठच्या बाजूला किंवा एखाद्या बोटावर होतो.यामुळे होणाऱ्या वेदना अक्षरशः अतुलनीय असतात. जवळपास प्रत्येकालाच होणाऱ्या या त्रासावर आपण अगदी सोप्प्या पद्धतीने घरगुती गोष्टींचा वापर करून उपचार करू शकता.. कसा? चला तर जाणून घेऊयात..
कसा घालवाल शु बाईट
टूथपेस्ट
व्हाईट टूथपेस्ट मधील मेंथॉल, हायड्रोजन पॅरोक्साईड आणि बेकिंग सोडा, कोणतीही जखम बरी करण्यासाठी फायद्याचे आहेत. आपल्या पायावर ही पेस्ट लावून 30 मिनिटं ठेवा व नंतर लगेचच कोमट पाण्याने धूवून टाका.
मध
मध हा त्वचेच्या कोणत्याही समस्येवरील नामी उपाय आहे. जर तुम्हाला शू बाईट झालं असेल तर त्या जागी थोडं मध लावा. मध लावले असताना धुळीपासून दूर राहा, बाहेर जाणे टाळा.
लिंबू
लिंबातील ऍसिड नॅचरल अँटीसेप्टीक म्हणून काम करतं तसेच खाजही कमी करतं. शू बाईटमुळे पायांवर पडलेले डागही कमी होण्यास मदत होते. लिंबाचा रस जखम झालेल्या जागेवर कापसाने लावून सुकू द्या आणि कोमट पाण्याने धूवून टाका.
बटाटा
बटाटा हे अँटीऑक्सीडंट आहे यामध्ये अँटीसेप्टीक व अँटीफ्लेमेटरी घटक असतात. बटाट्याचे जाडसर काप जखम झालेल्या जागी लावून किंवा बटाट्याचा रस कापसाने लावून कोमट पाण्याने धुवून काढावा. यामध्ये हळद मिसळल्यास आणखीन फायदा होतो.
तांदळाचे पीठ
तांदळाच्या पिठाची पेस्ट करून आपल्याला शु बाईट झालेल्या ठिकाणी लावा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत तर होतेच शिवाय मृत त्वचा निघून जाऊन पायावरील डाग देखील कमी होतात.
शु बाइट वरील उपाय करण्याची वेळच येऊ देऊ नका. अस्सल चामड्याच्या चपला किंवा निमुळत्या टोकाचे शूज, हाय हील्स अशा चपला घातल्यामुळे हा त्रास जाणवतो. कालांतराने या चप्पला सवयीच्या झाल्यावर हा त्रास कमी सुद्धा होतो पण ही रिस्क घेण्यापेक्षा अगोदरच तुमच्या पायच्या आकारानुसार अगदी मापाच्या आणि कम्फर्टेबल चप्पला निवडा. आणि तरीही समजा कधी काळी तुम्हाला पर्याय नसल्याने अशा चपल्लांचा वापर करावा लागला आणि शु बाईटचा त्रास उद्भवलाच तर या सोप्प्या ट्रिक्स वापरून तो लगेच दूर करा.