भाज्या ताज्या दिसाव्यात यासाठी केमिलकचा तर वापर केला नाही ना? 'या' सोप्प्या ट्रिक्सने तपासून पहा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशभरात 1-7 सप्टेंबर हा आठवडा न्युट्रिशन डे म्हणून साजरा केला जात आहे. अशातच आम्ही तुम्हाला याच संदर्भातील महत्वाची माहिती देणार आहोत. काही वेळा असे होते की, ज्या गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात त्यात काही वेळेस भेसळ केली गेल्यास त्याचा आरोग्याला फटका बसू शकतो. तर आरोग्यासाठी हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्या खाल्ल्याने शरिराला पुरेशा प्रमाणात विटामिन आणि मिनिरल मिळतात जे आपल्याला तंदुरुस्त ठेवतात. मात्र तुम्हाला जर एखाद्याने सांगितले बाजारात मिळणाऱ्या गोष्टींमध्ये भेसळ केली असेल तर तुम्ही चिंता अधिकच वाढेल.

नागरिकांनी आपण खरेदी करत असलेल्या भाज्या या हेल्दी आणि ताज्या आहेत की नाही ते तपासून पाहणे आपले कर्तव्य आहे. कारण त्यावर काही केमिकलचा वापर केला असेल तर अशा भाज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. यामुळे भाज्यांची क्वालिटी तपासून पहाणे महत्वाचे आहे. मात्र असे होऊ नये म्हणून FSSAI ने अगदी सोप्प्या पद्धतीने यावरील मार्ग काय असेल त्याबद्दल सांगितले आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही भाज्यांची गुणवत्ता तपासून पाहू शकता.

FSSAI ने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की, कापुस एका लिक्विड पॅराफिनमध्ये भिजवा. त्यानंतर तो कापुस भाज्यांच्या बाहेरील पानावर हलक्या हाताने फिरवा. थोड्याच वेळात तुम्हाला याचा रिजल्ट पहायला मिळेल.(Health Tips: नारळ पाणी पिण्यामागे 'ही' वैज्ञानिक कारणे नक्कीच ठरतील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर) 

Tweet:

जर कापसाचा रंग हिरवा झाल्यास तर त्या भाजीत भेसळ केल्याचे दिसून येईल. तसेच कापसाचा रंग बददला न गेल्यास त्यामध्ये कोणहीती भेसळ नाही. भाज्यांना रंग लावण्यासाठी मॅलाकाइट ग्रीन एक टेक्सटाइल डाय असून त्याचा वापर माशांच्या उपचारासाठी अँन्टीप्रोटोजोअल आणि अँन्टीफंगलच्या रुपात केला जातो.

याचा वापर काही कारण्यास्तव इंडस्ट्रीज, हेल्थ टेक्सटाइल आणि फूड मध्ये पॅरासिटीसाइटच्या रुपात सुद्धा करतात. या व्यतिरिक्त याचा वापर मिर्च्या, वाटाणे आणि पालक सारख्या हिरव्या भाज्या हिरव्यागार दिसण्यासाठी सुद्धा केला जातो.

नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इंन्फॉर्मेशनच्या मते हे डायचा परिणाम वेळ आणि तापमानासह वाढत जातो. तो कॅन्सर तयार करणाऱ्या कार्सिनोजेनेसिस, म्युटाजेनेसिस, क्रोमोसोमल फ्रॅक्चर्स, टेराटोजेनेसिटी आणि रेस्पिरेटरी टॉक्सिसीचे कारण ठरु शकते. याच्यामुळे मल्टीऑर्गेन टिशू सुद्धा धोका उद्भवू शकतो.

त्याचप्रमाणे बाजारातून खरेदी केलेल्या हळदीची गुणवत्ता सुद्धा तपासून पाहू शकता. यासाठी तुम्ही अर्धा ग्लास पाण्यात शुद्ध हळद आणि दुसऱ्या ग्लासात भेसळयुक्त हळद टाका. त्यानुसार शुद्ध असलेली हळद ही पाण्याखाली बसेल आणि भेसळयुक्त हळदीमुळे पाणी हलके पिवळे होईल.