Cancer दूर ठेवण्यासाठी रात्रीची शांत झोप आवश्यक पहा अचंबित करणारं हे कनेक्शन काय आहे?
sleeping woman (PC - Pixabay)

आपल्या लाईफस्टाईलचा आपल्या आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होत असतो. अशातूनच अनेक कॅन्सर (Cancer) च्या देखील समस्या निर्माण होत आहेत. कॅन्सर हा एक जटील आजार असून त्याच्या उपचारामध्येही मोठी काळजी घ्यावी लागते. नियमित उपचारांप्रमाणेच रूग्णांच्या आहाराच्या पथ्यपाण्याची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. झोप हा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. शांत झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. शरीरात अनेक लहान सहान गुंतागुंती शरीर आपोआपच झोपेमध्ये दुरूस्त करते. शरीरातील पेशींचे नुकसान आणि झीज देखील या शांत झोपेमध्येच भरून निघते.

कॅन्सर वर उपचार घेणार्‍यांनी किंवा कॅन्सरचा पुन्हा होणारा हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. असं Luke Coutinho या लाईफस्टाईल एक्सपर्टने म्हटलं आहे. Luke Coutinho यांनी आम्ही जेव्हा शांत झोप जे करू शकतं ते औषध, अन्न, सप्लिमेंट किंवा मॅजिक ऑईल देखील करू शकत नसल्याचं पाहून आश्चर्य वाटल्याचं म्हटलं आहे.

Melatonin हे अ‍ॅन्टी कॅन्सर हार्मोन आहे. हे हार्मोन केवळ झोपेसाठी आवश्यक नाही तर त्याचा परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारशक्ती आणि कॅन्सर शी देखील कनेक्टेड आहे. विज्ञानात त्याचा उल्लेख anti-cancer hormone केला आहे. ते एक प्रभावी antioxidant, anti-inflammatory आहे. शरीरात त्याचं प्रमाण कमी होणं हे कॅन्सरचा धोका अधिक बळकट करण्यासारखा आहे.

आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शरीरात melatonin मुक्तपणे फिरत असते. त्याच्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती सुधारते. असामान्यपणे वाढणाऱ्या पेशी शोधत असलेला सैनिक असा हा शरीरात फिरत असतो. त्यामुळे उत्तम स्वास्थ्यासाठी शांत झोप आवश्यक आहे. Cancer Capital of The World: भारत बनला 'जगातील कॅन्सरची राजधानी'; कर्करोग प्रकरणांमध्ये होत आहे झपाट्याने वाढ, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती .

रात्रीच्या वेळेस झोपताना जिथे झोपत आहात तिथे अंधारही आवश्यक आहे.

melatonin च्या चांगल्या निर्मितीसाठी शक्य तितक्या अंधार्‍या ठिकाणी झोपा. sleep mask वापर देखिल करून तुम्ही अंधार निर्माण करू शकता. ज्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे त्या शरीरात कॅन्सर वाढण्याची शक्यता कमी होते. अपुरी झोप ही शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत आहे.

Natural Killer पेशी या आपल्या शरीरात immune defense आहेत. शांत झोपेच्या वेळेस त्या आपल्या शरीरात निर्माण होत असतात. संशोधन असे सूचित करते की झोपेची कमतरता NK पेशीच्या कार्यामध्ये लक्षणीयरीत्या बिघाड करू शकतात. अभ्यासानुसार केवळ एका रात्रीच्या खराब झोपेनंतर NK पेशींच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये 70 टक्के घट दिसून येते.

Coutinho यांच्या म्हणण्यानुसार, झोपेला प्राधान्य दिल्यास कर्करोगाच्या पेशी शोधून काढण्याची आणि त्यांना वाढण्यापासून रोखण्याची आमच्या रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता वाढवू शकतो. आपण खातो ते अन्न, आपली झोप, व्यायाम, तणावाची पातळी, नकारात्मकता, हवामान, सूर्यप्रकाश, रेडिएशन, तीव्र दाह, अतिनील प्रकाश, अल्ट्रा-प्रक्रिया केलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न या सार्‍यांचा जनुकांवरही कळत नकळत परिणाम होत असतो.