First Avian Bird Flu Case in Antarctica (संग्रहित संपादित प्रतिमा)

First Avian Bird Flu Case in Antarctica: शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) हायली पॅथोजेनिक रोगजनक एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस (HPAIV) च्या उपस्थितीची पुष्टी केली आहे, ज्यामुळे पर्यावरणीय आपत्तीची भीती निर्माण झाली आहे. अंटार्क्टिकामधील हा बर्ड फ्लूचा अहवाल चिंताजनक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, शास्त्रज्ञांच्या गटाला मृत स्कुआस (Skuas) नावाच्या पक्ष्याच्या दोन नमुन्यांमध्ये एचपीएआयव्ही आढळला आहे. एचपीएआयव्ही ला सामान्यतः बर्ड फ्लू म्हणतात, जो पक्ष्यांमध्ये गंभीर आजार निर्माण करतो. हायर कौन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च (CSIC) च्या सेवेरो ओचोआ मॉलिक्युलर बायोलॉजी सेंटरचे शास्त्रज्ञ या विषाणूचा मानवांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करत आहेत.

शास्त्रज्ञ अँटोनियो अल्कामी डिसेप्शन बेटावरील स्पॅनिश अंटार्क्टिक बेस ‘गॅब्रिएल डी कॅस्टिला’ येथे संशोधन करत असताना त्यांना हा बर्ड फ्लू व्हायरस (पक्ष्यांमध्ये) आढळला. 24 फेब्रुवारी रोजी त्यांनी अधिकृतपणे व्हायरसच्या उपस्थितीची पुष्टी केली. त्यांनी व्यक्तींमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर संरक्षणात्मक उपायांचा वापर करून नमुने घेतले. नमुना संकलनानंतर त्याचा सुरक्षित अभ्यास सुलभ करण्यासाठी हे विषाणू त्वरित निष्क्रिय करण्यात आले. (हेही वाचा: Indian Spices to Treat Cancer: आता भारतीय मसाल्यांचा वापर करून होणार कर्करोगावर उपचार; IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट)

हे नमुने विश्लेषणासाठी स्पॅनिश अंटार्क्टिक बेसवर पाठवण्यात आले होते, जेथे संशोधक अँजेला व्हॅझक्वेझ आणि अँटोनियो अल्कामी यांनी त्याची तपासणी केली. शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, पक्ष्यांना एव्हीयन इन्फ्लूएन्झाच्या H5 उपप्रकाराची लागण झाली होती. मृत पक्ष्यांपैकी किमान एक पक्षी अत्यंत रोगजनक एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूने ग्रासला होता. कोलंबियाच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मंत्रालयाने देखील यावर जोर दिला आहे की, अंटार्क्टिकामधील हा बर्ड फ्लूचा शोध राष्ट्रीय ध्रुवीय कार्यक्रमांना मानवांमध्ये याचे संक्रमण रोखण्यासाठी त्यांच्या तयारीमध्ये मदत करेल.

दरम्यान, गेल्या महिन्यात, मुख्य भूप्रदेश अंटार्क्टिकाजवळ जेंटू पेंग्विनमध्ये बर्ड फ्लूचा एक प्रकार आढळला होता. त्यानंतर आता हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस अंटार्क्टिकापर्यंत पोहोचल्याची पहिली घटना आहे. हा प्रदेश इतर जगापासून दूर, वेगळा असूनही तसेच इथे पोहोचण्यासाठी अनेक नैसर्गिक अडथळे असूनही हा विषाणू इथपर्यंत पोहोचला आहे. हा विषाणू शोध अंटार्क्टिक उन्हाळ्यात नोंदवलेल्या पक्ष्यांच्या मृत्यूवर संभाव्यपणे प्रकाश टाकतो.