Representational Image | (Photo credits: Pixabay)

आजकाल धकाधकीच्या बनत चाललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत अनेक त्रास वाढत आहेत. यामध्ये अकाली मृत्यू होण्याचं एक कारण म्हणजे हार्ट अटॅक. कोणालाही कोणत्याही टप्प्यावर हार्ट अटॅक धोका संभावण्याचं प्रमाण  वाढल्याने काळजी घेणं अत्यावश्यक आहे.  तुमच्या आसपास कोणावरही असा प्रसंग ओढवल्यास घाबरून जाऊ नका. हार्ट अटॅक आल्यानंतरचा काळी काळ हा रुग्णांसाठी गोल्डन अव्हर असतो. त्यामुळे या काळात काळजी घेतल्यास आणि वेळीच योग्य उपचार दिल्यास जीव बचावण्यास मदत होते.

खोकून धमन्या मोकळ्या करा  -  

हार्ट आल्यानंतर छातीत वेदना जाणवतात . काहीना चक्कर येण्याचा त्रास जाणवू शकतो. अशावेळेस त्यांना जोरात खोकण्यासाठी प्रवृत्त करा. यामुळे ब्लॉक झालेल्या धमन्या मोकळ्या होण्यास मदत होते. मात्र रूग्ण बेशुद्ध होत आहे असे वाटत असल्यास हा उपाय करा.

सीपीआर फायदेशीर

हार्ट अटॅक हृद्याला बचावण्यासाठी, बंद पडलेलं हृद्याचं कार्य पुन्हा पुनरूज्जिवीत करण्यासाठी सीपीआर पद्धती फायदेशीर आहे. यामध्ये रूग्णाच्या छातीवर विशिष्ट प्रकारे दाब दिला जातो. ही अनेक रूग्णांसाठी नवसंजीवनी ठरते.

Sorbitrate गोळ्या -

हार्ट अटॅक आल्यानंतर रूग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यापर्यंत त्याच्या जीभेखाली Sorbitrate किंवा डिस्प्रिनची गोळी जीभेखाली ठेवा.

शांत रहा

हार्ट अटॅक आल्यानंतर रूग्ण शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होतात. अशावेळेस छातीत वेदना जाणवल्यास घाबरून जाण्यापेक्षा शांत राहण्याचा प्रयत्न करा. ताबडतोब कोणती वैद्यकीय मदत मिळेल याची काळजी घ्या. शांत झोपेसाठी रात्री आंघोळ करताना या'4' गोष्टी नक्की सांभाळा !

छातीतील वेदनांकडे दुर्लक्ष नको

अनेकदा छातीत वेदना या अ‍ॅसिडीटीचेही एक लक्षण असू शकते. त्यामुळे स्वतः निदान करुन कोणताच निष्कर्ष काढू नका. छातीत वेदना जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.