शांत झोपेसाठी रात्री आंघोळ करताना या'4' गोष्टी नक्की सांभाळा !
रात्रीची शांत झोप photo credits: PIxabay

बदलत्या लाईफस्टाईलमुळे असेल किंवा आहारातील चूकीचे पदार्थ यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होतो. तुम्ही किती तास झोपता यापेक्षा तुमची झोप शांत आणि गाढ असेल तर सकाळी उठल्यावर तुम्हांला फ्रेश वाटतेच. पुरेशी झोप घेऊनही तुम्हांला सकाळी प्रसन्न वाटत नसेल तर तुम्हांला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे.

तुमच्या अवतीभवतीचं वातावरण, तुमच्या आहरातील पदार्थ आणि फीटनेस रिजीम याचा परिणाम तुमच्या झोपेवर सकारात्मक पद्धतीने करण्यासाठी काही चांगल्या सवयी आजमावणं आवश्यक आहे. त्यापैकी एक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करणं...

रात्री आंघोळ करून झोपण्यापूर्वी या गोष्टींचं भान ठेवा

1. गरम पाण्याची आंघोळ

थंड पाण्याने आंघोळ करणं आरोग्यदायी आहे. मात्र तुम्ही खास शांत झोप येण्यासाठी प्रयत्न करतअसाल तर झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करावी. गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर शरीराच्या तापमानामध्ये बदल होण्यास सुरूवात होते. परिणामी आपोआप शांत मिळते.

2. मन शांत होते

आंघोळ केल्याने दिवसाचा थकवा, क्षीण दूर होतो. आंघोळ करताना तुम्ही पाण्यात इसेंशिअल ऑईल, सुवासिक तेलांचा वापर केल्यास मनाची अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. रात्री शांत झोप मिळण्यास मदत होते.

3. झोपण्यापूर्वी काही वेळ आधी आंघोळ टाळा

शांत झोप मिळवण्यासाठी आंघोळ करणं हा फार उत्तम पर्याय असला तरीही काही गोष्टींबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. आंघोळ केल्यानंतर शरीराला सामान्य स्थितीमध्ये येण्यासाठी काही वेळ देणं आवश्यक आहे. याकरिता रात्री झोपण्यापूर्वी किमान 1-2 तास आधी आंघोळ करणं हितकारी आहे.

4. थंड वातावरणात काही काळ रहा

आंघोळ झाल्यानंतर शरीराचं तापमान कमी करण्यासाठी थंड वातावरणात बसा किंवा चाला. यामुळे झोपण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. आरामदायी झोपेसाठी आंघोळ करून आल्यानंतर तुम्ही खोलीत एसी किंवा फॅन सुरू शकता.