Vitiligo | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

त्वचेवरील पांढरे डाग (कोड) आजारावर परिणामकारक औषध सापडलयाचा दावा करण्यात आला आहे. दुर्मिळ जडी-बुटी विषनाग पासून कोड Leucoderma बरा करता येतो असे या दाव्यात म्हटले आहे. सुमारे 10 हजार फुट उंचीवर मिळणाऱ्या विषनाग आणि इतर काही बुटींच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेल्या डीआरडीओ (DRDO) ल्यूकोस्किन चे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आयएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. प्राप्त माहितीनुसार देशभरात 4 ते 5% नागरिकांमध्ये कोड (Leucoderma) हा आजार दिसून येतो. जागतिक पातळीवर विचार करता एकूण लोकसंख्येच्या 1 ते 2% लोकांमध्ये हा आजार दिसून येतो.

जागतिक विटिलिगो दिन (World Vitiligo Day) पूर्वसंध्येला भारतीय संशोधकांनी यश मिळवल्याबाबत माहिती देताना एमिल फॉर्मास्युटिकल चे कार्यकारी निदेशक संचित शर्मा यांनी सांगितले की, विषनाग ही एक अत्यंत दुर्मिळ वनस्पती आहे. यापासून तयार झालेले ल्यूकोस्किन लावल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी 10-10 मिनिटे सूर्यकिरणे (कोवळ्या उन्हात) बसण्याचा सल्ला दिला जातो. कारण कोवळ्या उन्हामुळे त्वचेचे नुकसान कमी होते. त्यासोबतच शरीराला डी व्हिटॅमिनही मिळते. आतापर्यंत दीड लाख रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्यातील 70 ते 75 टक्के रुग्णांवर सकारात्मक परिणाम झाल्याचेही पाहायला मिळाल्याचे संचेती यांनी या वेळी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार देशभरात साधारण 4 ते 5 टक्के नागरिकांना कोड या त्वचारोगाचा सामना करावा लागतो. जागतिक पातळीवर मात्र याचे प्रमाण 1 ते 2 टक्के इतकेच आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये साधारण या आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते. दक्षिणेकडील राज्यांमध्येही या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते. (हेही वाचा, Coronil: कोव्हिड 19 वर पतंजलि कडून आयुर्वेदिक औषध, 3 दिवसांत 69% रूग्ण बरे होत असल्याचा बाबा रामदेव यांचा दावा)

कोड या आजाराचा विशेष असा काही त्रास नसला तरी, या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज पाहायाला मिळतात. त्यामुळे कोड झालेल्या व्यक्तींना कारणाशिवाय मनस्ताप सहन करावा लागतो. दरम्यान, भारतीय संशोधकांच्या संशोधनात हे नवे औषध एक संजीवनी म्हणून पुढे आल्याचे सांगितले जाते आहे. हे औषध तोंडावाटे घेतले आणि क्रिम म्हणून त्वचेलाही (ओरल व क्रीम) लावता येते.

दिल्ली येथील आयुर्वेद विशेषज्ञ डॉ. नितिका कोहली यांनी आयएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, कोड असलेल्या रुग्णामध्ये महिलांचेही प्रमाण अधिक आहे. या महिलांना अनेकदा मानसिक आजारांचाही सामना करावा लागतो. समाजातील अनिष्ठ चाली रीती, रुढी परंपरा यामुळेही त्यांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता ल्यूकोस्किन हे अधिक परिणामकारक ठरताना दिसत आहे. ही एक चांगली बाब आहे.