पतंजलि (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सामान्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. अशामध्ये औषधं शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अ‍ॅलोपॅथीच्या सोबतीने होमिओपॅथी आणि आता आयुर्वेदीक उपचारांनाही गती दिली जात आहे. आज योग गुरू बाबा रामदेव यांच्या संस्थानच्या पतंजली कडून कोरोना वर पहिलं आयुर्वेदीक औषध कोरोनिल लॉन्च करण्यात आलं  आहे. आज दुपारी 12 वाजता हरिद्वार येथील पतंजलि योगपीठ मध्ये हे औषध लॉन्च झाले. यावेळेस डॉक्टर, संंशोधक सोबत बाबा रामदेव देखील उपस्थित होते. यावेळेस श्वासारी वटी आणि कोरोनिल (Coronil) ही औषधं लॉन्च करण्यात आली आहेत.

पतंजलि योगपीठ कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना टॅबलेट वर शोध पतंजलि रिसर्च इंस्टिट्युट हरिद्वार आणि नॅशनल इंसटिट्युट ऑफ मेडिकल सायंस जयपूर यांनी प्रयत्न केले आहेत. हे टॅबलेट दिव्य फार्मेसी आणि पतंजलि आयुर्वेद लिमिटेड हरिद्वार मध्ये झालं आहे.

दरम्यान औषधांच्या क्लिनिकल कंट्रोल ट्रायल झाल्या आहेत. तसेच यामुळे 3 दिवसांत 69% रूग्ण बरे झाले असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.

आचार्य बालकृष्ण यांचे ट्वीट  

ANI Tweet 

पतंजलि योगपीठकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्वामी रामदेव, आचार्य बालकृष्ण (Balkrishna)यांच्याकडून औषधाबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान दावा करण्यात आल्यानुसार या आयुर्वेदिक औषधामुळे 5-14 दिवसात रूग्ण ठीक होऊ शकतो. COVID-19 वर आयुर्वेदाकडे औषध असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्याचे 100% परिणाम मिळाले आहेत.