प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Maxpixel)

भारताच्या आधीपासून जगातील बर्‍याच देशांमध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचा हाहाकार सुरू झाला होता. यामुळे जानेवारी 2020 पासून जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे. भारतात, 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू आहे. आता संपूर्ण जग जवळ जवळ 8 महिन्यांपासून कोविड-19 महामारीशी संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत जगभरातील अनेक कोटी लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. घराच्या आत कैद असलेले कोट्यावधी लोक तणाव आणि चिंतेचे बळी पडले आहेत. वर्क फ्रॉम होमेमध्ये लोकांना ऑफिसपेक्षा घरात जात काम करावे लागत आहे. लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे लोक अनेक गंभीर आजाराचे बळी ठरले आहेत.

या सर्वावांबाबत गूगलवर लोक ताणतणाव (Depression) आणि चिंता दूर करण्यासाठी उपाय आणि औषधे शोधत आहेत. अनेक वृद्ध एकटेपणाचा संघर्ष करीत आहेत. म्हणून, एकाकीपणावर मात करण्यासाठी आता लोक गूगलचा आधार घेत आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) नुकत्याच केलेल्या जागतिक आरोग्य सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी उघडकीस आल्याची माहिती, टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. कोविड-19 दरम्यान जगातील 17 टक्क्यांपेक्षा जास्त लोक नैराश्याने व चिंतेने ग्रस्त आहेत. प्रत्येक दोनपैकी एक तरुण डिप्रेशनचा शिकार आहे.

एकीकडे लॉकडाऊनने लोकांना त्यांच्या अंगी असणाऱ्या कला जपण्यासाठी, काहीतरी नवीन शिकण्यासाठी वेळ दिला आहे, परंतु यामुळे लोकांना बर्‍याच गोष्टींपासून दूर केले गेले आहे. या अहवालातील निष्कर्षांनुसार, नियमित वर्गापेक्षा ऑनलाइन अभ्यासामुळे मुले 65 टक्के कमी शिकले आहेत. 50 टक्के तरुण विद्यार्थ्यांनी असे सांगितले की, त्यांच्या शिक्षणास विलंब होण्याची भीती आहे व ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये आहेत. 9% म्हणाले की त्यांना परीक्षेत 'अयशस्वी' होण्याची भीती आहे. यासह तरुणांनी नोकरी गमावल्यामुळे व नोकरी सोडायला लागण्याच्या भीतीमुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या आहेत. (हेही वाचा: लग्नाला 22 महिने होऊनही पत्नी शारीरिक संबंध ठेऊ देत नव्हती; नैराश्यग्रस्त पतीने केली आत्महत्या, बायकोविरुद्ध गुन्हा दाखल)

या सर्वेक्षणातील निष्कर्ष ‘Youth and Covid-19: impacts on jobs, education, rights and mental well-being’, या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात 112 देशांमधील 12,000 लोकांनी सहभाग नोंदवला होता. त्यात सुशिक्षित तरुण आणि इंटरनेट सुविधा असणार्‍या लोकांचा समावेश होता. या अभ्यासात 18-22 वयोगटातील लोकांचा समावेश होता. लोकांकडून रोजगार, शिक्षण, मानसिक आरोग्य आणि समाजकल्याण या विषयांची माहिती घेण्यात आली व लोकांनी याबाबत त्यांची मते व्यक्त केली.