प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

पुरुषांमध्ये आजकाल दाढी (Beard) वाढवण्याचा ट्रेंड सुरु आहे. व्यक्तिमत्वाला आकर्षक रूप प्राप्त व्हावे म्हणून दाढीला ठराविक शेप दिले जातात, त्यांची व्यास्थित काळजी घेतली जाते. दुसरीकडे चेहऱ्यावरील हेच अनावश्यक केस (Facial Hair) काढण्यासाठी स्त्रिया धडपडत असतात. होय, काही महिलांच्या चेहर्‍यावर पुरुषांसारखे केस येतात. मात्र स्त्रियांचे गाल, हनुवटी आणि ओठांवरचे केस थोडे अडचणीचे ठरतात. भारतीय समाजामध्ये दाढी-मिशीवाली स्त्री ही कल्पनाच करवत नाही. मात्र त्यात काही चूक नाही. स्त्रियांच्याही चेहऱ्यावर केस येतात, ते केस ठेवायचे का काढायचे हा व्यक्तीपरत्वे निर्णय घेण्याचा मुद्दा आहे. मात्र तुमच्याही चेहऱ्यावर केस असतील आणि ते ठेवायचे नसतील तर त्यावर पुढील उपाय करू शकता.

सर्वात आधी स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस का येतात हे जाणून घ्या. साधारण अनुवंशिकता आणि हार्मोनमध्ये होणारे बदल यामुळे मुलींच्या चेहऱ्यावर केस येतात. जीवनशैली मध्ये होणाऱ्या बदलामुळे हार्मोन्समध्ये बदल घडतात, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांचे प्रमाण वाढले तर प्रथम आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

> अंड्याचा मास्क – अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात चमचा साखर आणि अर्थ चमचा मक्याचे पीठ घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 30 मीने तसेच ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

> साखर लिंबू – विरघळलेल्या साखरेत लिंबाचे काही थेंब टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.

> केळं आणि ओट्सचा स्क्रब – व्यवस्थित कुस्करलेल्या केळामध्ये 2 चमचे ओट्स घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. (हेही वाचा: Men’s Lifestyle: एखाद्या अभिनेत्याप्रमाणे हेअरस्टाईल हवी आहे? केसांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या टिप्स)

> लिंबू-मध – केस येणाऱ्या जागी कापलेल्या लिंबावर मध घेऊन तो चोळल्यास फायदा होऊ शकतो.

> डेपिलोटोरिएस – चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी डेपिलोटोरिएस नावाचे एक केमिकल उपलब्ध आहे. हे केमिकल वापरताना नमूद केलेले नियम काटेकोरपणे पाळा

> ब्लीचिंग - ब्लीचिंगनेही चेहऱ्यावरील नको असलेले केस नाहीसे होतात. मात्र हा उपाय तुमच्या त्वचेला सूट होतो का नाही हे तपासून पहा.

> चेहऱ्यावर सतत येणाऱ्या केसांवर लेझर ट्रीटमेंट हा एक उपाय आहे. मात्र हा थोडा खर्चिक आहे तसेच नामांकित रुग्णालयामध्येच ही ट्रीटमेंट करून गरजेचे आहे.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)