Benefits Of Tamarind: उच्च रक्तदाब ते तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते चिंच, जाणून घ्या फायदे
Tamarind (Photo Credits-Facebook)

चिंच (Tamarind) खाणे हे सर्वांना जसे आवडते तसेच त्याचे फायदे सुद्धा आरोग्यासाठी अधिक महत्वाचे आहेत. खरंतर आंबड-गोड अशी चव असणाऱ्या चिंचेचे सेवन केल्यास काही प्रमाणात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचसोबत वजन सुद्धा नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. चिंच ही मुत्रपिंडासाठी सुद्धा फायदेशीर आहे. औषधी गुणांनी भरपूर असलेली ही चिंच शरीरातीय चयापचयाची क्रिया सुरळीत ठेवण्यात ही मदत करते. त्याचसोबत हृदयासाठी उत्तम मानली जाते. चिंचेत विटामिन सी, ई आणि बी सह कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, पॉटेशिअम, मॅगनिज आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येतात. जे आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचे आहेत. तर जाणून घ्या चिंच कशा पद्धतीने आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

चिंच ही तुमचा लठ्ठपणा काही प्रमाणात नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेले जाइड्रोसिट्रिक नावाचे अॅसिड असून ते शरीरातील फॅट कमी करते. तसेच अतिप्रमाणात खाण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्यास चिंच मदत करते.(Health Tips: ओवा खाल्ल्याने न केवळ पचनक्रिया सुधारते तर दातदुखी आणि कानदुखीवर 'अशा' पद्धतीने ठरतो गुणकारी)

ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे त्यांनी चिंच जरुर खावी. कारण यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण बहुतांश प्रमाणात नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते. तसेच कार्बोहायड्रेट्स शोषून घेण्यास मदत करत नाही. त्यामुळे साखरेचे प्रमाणात नियंत्रित राहते. ऐवढेच नाही तर चिंचेत अँन्डिऑक्सिडेंट तत्व भरपूर प्रमाणात असतात. यामध्य टॅरट्रिक अॅसिड असून ते शरिरातील कॅन्सर सेल्स वाढवू देत नाहीत.(Benefits of Coconut: रोज ओलं खोबरं खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासोबत शरीरास होतात 'हे' आरोग्यदायी फायदे)

जर तुम्हाला मुत्रपिंडा संबंधित काही समस्या असल्यास तुम्ही चिंच खाण्याची सवय लावून घेऊ शकता. कारण चिंच तुमच्या मुत्रपिंडाला तंदुरुस्त राखण्यास मदत करु शकते. त्याचसोबत चिंच तुम्हाला असणाऱ्या उच्च रक्तदाबावर सुद्धा नियंत्रण ठेवू शकते. चिंचेत असणारे लोह आणि पोटॅशिअम जे बीपी कंट्रोल करण्यास मदत करतात. तसेच रेड ब्लड सेल्स वाढवण्यास सुद्धा चिंच मदत करते.