नारळी पौर्णिमा (Narali Purnima) अगदी उद्यावर येऊन ठेपली आहे. या सणादिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ (Coconut) अर्पण करुन समुद्राची पूजा करतात. या दिवशी ओल्या खोब-यापासून बनवलेले अनेक पदार्थ बनवेलेल जातात. खोब-याच्या वड्या, नेव-या यांसारखे अनेक पदार्थ बनवलेले जातात. सगळीकडे कसे आनंदीआनंद असे वातावारण असते. अनेकांना ओलं खोबर नुसतं खायला आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, रोज ओलं खोबर खाल्ल्याने शरीरास आरोग्यदायी असे फायदे होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापासून पचनशक्ती सुधारण्यापर्यंत अनेक गुणकारी फायदे शरीरास होतात.
नारळाचं दूध अत्यंत फायदेशीर आहे. सामान्यत: नारळाची ही गुणकारी आणि लाभदायक बाजू फारच कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेऊया या बहुगुणी ओलं खोबरं खआण्याचे फायदे:
1. पचनशक्ती सुधारते
जर तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील तर रोज थोडं ओलं खोबर खावे वा पुदिणा, आलं, लसूण यापासून बनवलेल्या चटणीत ओलं खोबरं वाटून ते खावे. आहारात नक्की कोणते तेल वापरावे? जाणून घ्या तेलाचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे
2. रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
खोब-यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
3. उलट्या होत असल्यास आराम मिळतो
तुम्हाला अति उष्णतेमुळे उलट्या होत असल्यास ओलं खोबर खाल्लायस आराम मिळतो.
4. नाकातून रक्त येणे थांबते
काही जणांना उष्णतेमुळे नाकातून रक्त येते. अशा लोकांनी ओलं खोब-याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
5. वजन नियंत्रित करण्यासाठी
नारळाचे सेवन केल्यास वजन वाढण्याची प्रक्रिया संथ होते.
नारळाच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता वाढते. हे यामुळे शक्य होतं कारण नारळात ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात. ज्यातील पौष्टिक तत्व तुमच्या ब्रेन सेल्सना सक्रीय करतात आणि तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)