Health Tips: ओवा खाल्ल्याने न केवळ पचनक्रिया सुधारते तर दातदुखी आणि कानदुखीवर 'अशा' पद्धतीने ठरतो गुणकारी
Carom Seeds (Photo Credits: Wikimedia Commons)

निसर्गामध्ये अनेक गुणकारी पदार्थांचा वापर मसाला बनविण्यासाठी केला जातो. लवंग, दालचिनी, तेजपत्ता, काळीमिरी सह आणखी एक महत्त्वाचा आणि गुणकारी असा पदार्थ म्हणजे ओवा (Carom Seeds). ओव्याला मसाल्याला चव आणण्यासाठी वापर केला जातो तितकाच अनेक विकारांवरही गुणकारी समजला जातो. कधी आपल्याला अपचन झाले असेल वा पोटात दुखत असेल तर घरगुती उपाय म्हणून आपल्याला त्वरित ओवा (Ajwain) दाताखाली चावण्यास सांगतात. त्याच्यामागे कारणही तितके खास आहे. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. त्यामुळे ओव्याचा (Ajwain) नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो. त्यासोबतच अनेक आजारांवर ओवा गुणकारी आहे.

पचनक्रिया सुधारण्यासाठी, पोटदुखी, सर्दी, खोकला यावर ओवा जितका गुणकारी आहे त्याचप्रमाणे खाली दिलेल्या आजारांवरही ओव्याचा नैसर्गित औषध म्हणून वापर केला जाऊ शकतो.

1. दातदुखी

दात दुखणे अथवा हिरड्या सुजण्याची समस्या निर्माण होते. यांसारख्या त्रासदायक वेदना होत असल्यास ओव्याच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास आराम मिळतो. दात दुखत असल्यास ओव्याचे तेल कापसाच्या बोळ्याने दातांवर लावावे अथवा त्या दाताच्या हिरडीला ओव्याच्या तेलाने मसाज करावा.

हेदेखील वाचा- Benefits of Coconut: रोज ओलं खोबरं खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासोबत शरीरास होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

2. कानदुखी

कान दुखत असल्यास ओव्याचे तेलाचे काही थेंब कानात घालावे. ज्यामुळे कानात जे ठणके मारत असतात ते कमी होते.

3. मायग्रेन

ओवा गरम करून त्याचा वास घेतल्याने अथवा ओव्याचा लेप डोक्यावर लावल्यामुळे मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.

4. मुळव्याधीमध्ये रक्त पडण्याचा त्रास होत असेल तर त्याापासून आराम मिळण्यासाठी ओवा फायदेशीर आहे. यासाठी नियमित ताकातून जिरेपावडर आणि ओव्याची पावडर घ्या.

5. सांधेदुखी अथवा पाठदुखी होत असल्यास ओवा गरम करून तो एका कपड्यात बांधावा आणि त्याचा दुख-या भागावर शेक घ्यावा. आराम मिळेल.

ओवा खाल्याने शरीरातील हानिकारक द्रव्ये बाहेर पडतात. कफ निघून जाण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन फायदेशीर ठरते.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)