Lungs | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशावेळी फुफ्फुसाचे आरोग्य व्यवस्थित आहे का नाही याची तपासणी घरीच केली तर, योग्य वेळी रुग्णालयात दाखल होण्यास मदत होईल. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने यासाठी ‘6-मिनिट वॉक टेस्ट’ (6-Minute Walk Test) सांगितली आहे. 6-मिनिट चालण्याची चाचणी ही एक सोपी आणि घरगुती पद्धत आहे. ही चाचणी रक्तातल्या ऑक्सिजनची लपलेली कमतरता (Happy Hypoxia) जाणून घेण्यास मदत करते.

कोणी करावी ही चाचणी?

ताप, सर्दी, खोकला किंवा कोव्हिड-19 ची इतर लक्षणे असणाऱ्या व्यक्ति, घरगुती विलगीकरणात (होम आयसओलेशन) मध्ये असणाऱ्या व्यक्ति ही चाचणी करू शकतात.

कुठे करावी?

  • ही चाचणी कुठल्याही कडक जमिनीवर/पृष्ठभागावर (Hard Surface) वरच केली जावी.
  • ज्या जमिनीवर चालणार आहात त्या जमिनीवर चढ-उतार नसावेत.
  • पायऱ्यांवर ही चाचणी केली जाऊ शकत नाही.
  • घरातल्या कडक फरशीवर करणे कधीही चांगले
  • चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकामी जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करावी.

आवश्यक साहित्य-

  • घडयाळ/स्टॉपर्वोच (मोबाईल फोन)
  • पल्स ऑक्सिमीटर

कशी करावी?

    • तुमच्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावा आणि त्यावर दिसणाऱ्या तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा.
    • पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घडयाळ/स्टॉपवॉच लावून सहा मिनिटे फिरा/चाला.
    • अति वेगात किंवा अति हळू चालू नये, मध्यम आणि स्थिर गतीने चालणे योग्य.
    • सहा मिनिटे सलग स्थिर गतीने चालून झाल्यानंतर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.

असे असेल तर काळजीचे काही कारण नाही -

  • सहा मिनिटे चालल्या नंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत
  • नसेल तर अगदी उत्तम. तुमची तब्येत एकदम चांगली आहे.
  • जर रक्तातील ऑक्सिजनची पातळी केवळ 1 ते 2 टक्क्यांनी कमी होत असेल तरीही काळजी करावयाचे कारण नाही.
  • यामध्ये काही बदल होत नाही हे पाहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ही चाचणी करावी.

असे असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या –

  • रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर 93 पेक्षा कमी होत असेल.
  • जी पातळी होती त्या पातळीपेक्षा 3 टक्यांपेक्षा अधिकने कमी होत असेल
  • सहा मिनिटे चालल्या नंतर तुम्हाला दम/धाप लागल्यासारखे वाटत असेल
  • याचा अर्थ तुम्हाला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे. असे होत असेल तर लवकरात लवकर रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.

इतर महत्वाचे मुद्दे -

  • 60 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ति 6 मिनिटांऐवजी 3 मिनिटे चालूनदेखील ही चाचणी करू शकतात.
  • चाचणी करताना शक्यतो एका व्यक्तीला सोबत बसवणे चांगले, जेणेकरून खूप दम लागला तर ती मदत करू शकेल.
  • बसल्याजागी ज्यांना दम/थाप लागत असेल त्यांनी ही चाचणी करू नये.
  • चाचणी करतेवेळी जर ऑक्सिमीटर वरील ऑक्सिजन पातळी 3% पेक्षा अधिकने घटली किंवा 93% पेक्षा कमी झाली तर चालणे लगेच थांबवा आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा.