
सहसा नात्यामध्ये असलेले कपल्स नेहमीच आपल्या पार्टनरसोबत साऱ्या गोष्टी शेअर करतात. जेव्हा नाते नवीन असते, फुलत असते तेव्हा तर हे शेअरिंग खूपच जास्त प्रमाणात होते. एकमेकांची काळजी घेण्यासोबतच एकमेकांना समजून घेण्याची ती वेळ असते. मात्र प्रत्येक नात्यात अशा काही गोष्टी असतात ज्या जाणूनबुजून आपल्या जोडीदारापासून लपवल्या जातात. कदाचित त्या जीवनात घडलेल्या मोठ्या गोष्टी नसतील मात्र, छोट्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या जोडीदाराला सांगितल्या जात नाहीत. याबाबतीत मुलींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. भलेही मुलगी आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करत असेल मात्र, अशा काही गोष्टी आहेत ज्या ती सफाईदारपणे आपल्या जोडीदारापासून लपवते.
चला जाणून घेऊया अशा 5 गोष्टी ज्या मुली आपल्या जोडीदारापासून लपवतात आणि जोडीदाराला याची कल्पनासुद्धा नसते की ती आपल्यासोबत खोटे बोलत आहे.
> तूच माझे पहिले प्रेम आहेस – भलेही सध्या असलेल्या जोडीदाराआधी मुलीचे एखादे प्रेमप्रकरण असेल, तरी मुली ही गोष्ट आपल्या सध्याच्या जोडीदारापासून लपवून ठेवतात. कधी तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा उल्लेख झालाच तर, ती तो एक मित्र होता असेच सध्याच्या जोडीदाराला भासवते, आणि ‘तूच माझे पहिले प्रेम आहे’ हे त्याच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करते.
> प्रत्येक गोष्टीत ‘मला माहित नाही’ हे उत्तर देणे – गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये कोणत्याही कारणामुळे भांडण झाले, तर मुली स्वतःची नाराजी दाखवून देत नाहीत. एखाद्या भांडणानंतर तुमची गर्लफ्रेंड कोणत्याही प्रश्नांचे उत्तर ‘मला नाहीत नाही’ असे द्यायला लागली, तर समजा ती तुमच्यावर नाराज आहे. मात्र ती तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवण्याचा पयत्न करत आहे. अशावेळी तिच्यावर विश्वास न ठेवता तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणे हाच उत्तम पर्याय ठरतो.
> ‘माझा ड्रेस तितकासा चांगला नाही ना?’ – जर का तुमची गर्लफ्रेंड कोणता चांगला ड्रेस घालून आली, आणि तुम्हाला विचारले की, ‘माझा ड्रेस तितकासा चांगला नाही ना?’ तर अशावेळी विचार करून उत्तर द्या. तुम्ही विचार केला नाही तर तुम्हाला ब्रेकअपचा सामनाही करावा लागू शकतो. तर हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला विचारात असते. मात्र उत्तरादाखल तिला ‘ती त्या ड्रेसमध्ये छान दिसत आहे’ हेच ऐकायचे असते. त्यामुळे पुढच्या वेळी जर का तुमच्या गर्लफ्रेंडने तुम्हाला हा प्रश्न विचारला तर समजा, तुमची गर्लफ्रेंड खोटे बोलत आहे आणि तिला तुमच्या तोंडून तिची तारीफ ऐकायची आहे.
> ‘मी स्वतःकडे तितकेसे लक्ष देत नाही’ – कोणतीही मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला जाताना नेहमीच तयार होऊन जात असते, तरी ती नेहमीच आपल्या बॉयफ्रेंडला हे सांगत असते की ‘मी स्वतःकडे तितकेसे लक्ष देत नाही’. किंवा ‘मला नटायला किंवा मेकअप करायला तितकेसे आवडत नाही’. तुमची प्रेयसीसुद्धा तुम्हाला असेच काही म्हणत असेल तर समजा ती साफ खोटे बोलत आहे. तिलाही सुंदर दिसण्याची हौस आहे मात्र ही गोष्ट तिला तुमच्यापासून लपवून ठेवायची आहे. (हेही वाचा: Sex मध्ये पुरुषांना परमोच्च आनंद कशाने मिळतो? जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी स्त्रियांना या गोष्टी माहिती असायलाच हव्या)
> ‘या गोष्टीने मला काही फरक पडत नाही’ – जर का तुम्ही तुमच्या प्रेयसीसमोर दुसऱ्या कुठल्या मुलीची तारीफ केली, अथवा दुसऱ्या मुलीला न्याहाळले, तर तुमची प्रेयसी म्हणेल ‘या गोष्टीने मला काही फरक पडत नाही’. मात्र लक्षात ठेवा ती पूर्णपणे खोटे बोलत आहे. असेही होऊ शकते की तुमचे हे वागणे ती नोटीस करत असेल आणि वेळ आपल्यावर त्याबाबतीत बदला घेईल. त्यामुळे आपली प्रेयसी सोबत असताना शक्यतो तिच्यावरच लक्ष देणे फायद्याचे ठरेल.
तर तुमचीही गर्लफ्रेंड अशा गोष्टी सांगत असेल तर वेळीच समजा की ती खोटे बोलत आहे, व तिच्या अशा गोष्टींकडे जास्त लक्ष न देता ज्या गोष्टी नात्यासाठी खरच महत्वाच्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा.