World Vegan Day 2020:  Vegetarianism आणि Veganism मध्ये नेमका फरक काय?
World Vegan Day 2020 (Photo Credits: File Image)

जगभरात 1 नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड विगन डे (World Vegan Day) म्हणून साजरा करतात. cruelty-free way of life म्हणजेच प्राणीजीवांना कोणतीही हानी न पोहचवता आपलं जीवन जगण्याचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती म्हणजे व्हिगन. जगभरात Vegan लाईफस्टाईल स्वीकरलेल्यांची मोठी यादी आहे. यामध्ये बड्या सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे. भारतामध्ये शाकाहारी लोकं आहेत. मांस, मटण टाळणारे काही पंठ आहेत. पण व्हिगन हे शाकाहारींमधीलही एक वेगळा गट असून त्यांच्यामध्ये आहाराच्या, नेहमीच्या जीवनात वस्तू निवडीचे थोडे कडक नियम असतात. त्यामुळे तुम्हांलाही Vegetarianism आणि Veganism यामधील फरक स्पष्ट ठाऊक नसेल तर जाणून घ्या या दोन्ही पद्धती नेमक्या असतात कशा? आहाराबद्दल त्यांचे नियम कसे असतात?

शाकाहरींमधील एक गट म्हणजे Veganism

भारतामध्ये साधारण 20% लोकं ही शाकाहरी आहेत. त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये मांस मच्छी यांचा समावेश नसतो. पण Veganism हा शाकाहरी लोकांमधील एक गट आहे. त्यांचे खाण्या-पिण्याचे नियम कडक असतात. शाकाहरी पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खातात केवळ मांस टाळतात पण व्हिगन यांच्या आहारामध्ये प्राण्यांना त्रास देऊन आहारासाठी वापरलेल्या सार्‍याच गोष्टींचा त्याग करतात. त्यामध्ये दूध, मध, पाम ऑईल यांचादेखील समावेश आहे. तसेच लाईफस्टाईल मध्ये लेदर, सिल्कचा वापरदेखील टाळला जातो.

शाकाहरी ला धर्माची शिकवण व्हिगन ही निवड

भारतामध्ये हिंदू धर्मीयांमध्ये वैष्णवजन किंवा जैन धर्मीय यांना धार्मिक शिकवणीचा एक भाग म्हणून मांसाहार टाळण्याची शिकवण असते. पण व्हिगन असणं ही निवड आहे. 1944 साली काही ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन ही संकल्पना पुढे आणली आणि जगभर त्याचा प्रसार केला. व्हिगन होण्यासाठी धर्माचं अंतर नाही.

तुम्ही शाकाहरी असणं हा व्हिगन होण्याकडच्या प्रवासाचा मोठा टप्पा आहे. दरम्यान व्हिगन होणं हे केवळ डाएट आणि हेल्थ शी निगडीत नाही तर ती एक जीवनपद्धती आहे. यामध्ये प्राणी आणि मनुष्य दोघेही या जगात स्वतंत्रपणे जगू शकतात.