बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) आपल्या विविधांगी भूमिकांसाठी आणि त्यावर घेतलेल्या मेहनतीसाठी प्रसिद्ध आहे. आता नेहा पेंडसेने तिच्या नवीन प्रकल्पासाठी, एका नव्या गोष्टीच्या सुरुवातीसाठी व्हेगन-पूर्णतः शाकाहार (vegan)आहार स्वीकारला आहे. महत्वाचे म्हणजे अचानक जीवनशैलीत झालेला हा बदल नेहाला प्रचंड आवडला आहे. एखाद्या मशीनमध्ये अत्यंत शक्तिशाली इंधन भरले असल्यासारखे, वाटत असल्याची प्रतिक्रिया नेहाने दिली आहे.
याबाबत बोलताना ती म्हणते, ‘मी कुठेतरी वाचले होती की, तुम्ही जे खाता तेच तुम्ही असता. माझ्याबाबत हे अत्यंत खरे असल्याचे दिसत आहे.
ती पुढे म्हणते, ‘मी शाकाहारी झाल्यानंतर मला स्वत: ला खूप तंदुरुस्त असल्यासारखे वाटत आहे, आणि सध्या ही फार महत्वाची गोष्ट आहे. एका नव्या गोष्टीवर काम करण्याच्या प्रक्रियेसाठी मी ही गोष्ट सुरु केली होती, जी मला प्रचंड आवडत आहे.’ आता नेहाने नक्की कोणत्या गोष्टीसाठी इतका मोठा बदल स्वीकारला आहे हे लवकरच समजेल. (हेही वाचा: नेहा पेंडसे चा नवरा शार्दुल सिंह विषयी तुम्हाला माहित आहे का ही गोष्ट? ऐकून तुमचेही डोळे चक्रावतील)
दरम्यान, याआधी 5 जानेवारी रोजी नेहा पेंडसे आपल्या बॉयफ्रेंड सोबत विवाहबंधनात अडकली. पुण्यात अगदी पारंपरिक मराठी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. शार्दुल असे नेहाच्या पतीचे नाव आहे. यापूर्वी नेहा 2-3 रिलेशनशिपमध्ये होती, पण त्यात ती अपयशी ठरली. पण या ब्रेकअपमुळे मी एक खंबीर महिला बनली असल्याचे मत तिने व्यक्त केले. पुढे ती म्हणते, ‘शार्दुलला दोन गोंडस मुली आहेत याची मला पूर्ण कल्पना होती. तसेच त्याची याआधी दोन लग्न झाली आहेत ही गोष्टही त्याने लग्नाआधीच सांगितली होती. त्याने माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपविली नाही’.