नेहा पेंडसे चा नवरा शार्दुल सिंह विषयी तुम्हाला माहित आहे का ही गोष्ट? ऐकून तुमचेही डोळे चक्रावतील
Nehha Pendse Wedding (Photo Credits: Instagram)

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वत:च्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) नुकतीच लग्न बंधनात अडकली. अगदी घरच्या मोजक्या लोकांच्या समक्ष या 5 जानेवारीला शार्दुल सिंह बयास (Shardul Singh Bayas) याच्याशी तिचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. नेहाने आपण आपल्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्नगाठीत अडकल्याचा आनंद झाल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच 'स्पॉटलाईट' शी बोलताना नेहाने शार्दुल बाबत आणखी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. आपले पती शार्दुल यांची ही गोष्ट आपल्याला लग्नाआधीच माहित होती असेही तिने सांगितले या मुलाखतीत म्हटले आहे. शार्दुल यांचे हे तिसरे लग्न असल्याचे नेहाने सांगितले.

ही गोष्ट नेहा साठी जरी नॉर्मल असली तरी हे ऐकून नेहाच्या चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे. लग्नानंतर पहिल्यांदा नेहाने स्पॉटबॉयशी दिलेल्या मुलाखतीत तिने ही माहिती दिली. नेहा म्हणाली शार्दुल याचा याआधी 2 वेळा घटस्फोट झाला आहे. त्याची पहिली पत्नी अनिता अग्रवाल ही एक व्यावसायिक महिला आहे. इतकच नव्हे तर शार्दुल रिया आणि आलिया अशा दोन मुलीही आहेत. 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. नेहा ही त्याची तिसरी पत्नी आहे.

 

View this post on Instagram

 

वधू वरयो:शुभम भवतु सावधान

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

हेदेखील वाचा- Neha Pendse Marriage: 'शार्दूल राव आहेत बरे' म्हणत नेहा पेंडसे ने लग्नात घेतलेला उखाणा ऐकलात का?

आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना ती म्हणाली यापूर्वी नेहा 2-3 रिलेशनशिपमध्ये होती, पण त्यात ती अपयशी ठरली. पण या ब्रेकअपमुळे मी एक खंबीर महिला बनली आहे. पुढे ती म्हणाली, शार्दुलला दोन गोंडस मुली आहेत याची मला पूर्ण कल्पना होती. तसेच त्याची याआधी दोन लग्न झाली आहेत ही गोष्टही त्यांनी लग्नाआधीच सांगितले होते. त्याने माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपविली नाही", असेही तिने सांगितले आहे.

Neha Pendse चा नवरा Shardul Singh विषयी तुम्हाला माहित आहे का ही गोष्ट? ऐकून तुमचेही डोळे चक्रावतील Watch Video

चित्रपटांसह तिने अनेक मालिकांमधूनही काम केलं आहे. शिवाय सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 11' मध्येही नेहा सहभागी झाली होती.