Neha Pendse Marriage: 'शार्दूल राव आहेत बरे' म्हणत नेहा पेंडसे ने लग्नात घेतलेला उखाणा ऐकलात का?
Neha Pendse (Photo Credits: Instagram)

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या लग्नाची चर्चा होतीकाल 5  जानेवारी रोजी अखेरीस लग्नबंधनात अडकले. ग्रहमुख, संगीत, मेहेंदी , हळद या सर्व पारंपरिक रीती फॉलो करत नेहा आणि तिचा बॉयफ्रेंड शार्दूल सिंह बायस (Shardul Singh Bayas). सर्व लग्नविधींप्रमाणे प्रत्येक लग्न सोहळ्यात आणखीन एक खास भाग असतो तो म्हणजे उखाणा.. प्रत्येक नवं दांपत्याला उखाणे घेण्याचा आग्रह हा आवर्जून केला जातो, हे सेलिब्रिटी देखील त्याला अपवाद नाहीत. नेहाच्या लग्नाला आवर्जून गेलेल्या तिच्या मित्र मैत्रिणींनी जेव्हा तिला उखाणा घेण्याचा आग्रह केला तेव्हा तिनेही आपल्या खुमासदार शैलीत पतीचे नाव घेत त्यांची मागणी पूर्ण केली. अभिनेता अभिजित खांडकेकर (Abhijit Khandkekar) यांनी या खास क्षणाचा एक छोटासा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे.  अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या लग्नातील 'हे' खास क्षण नक्की पहा या फोटोंमधून (Photos Inside)

नेहाने उखाणा घेताना आपल्या पतीला म्हणजेच शार्दूलला मजेत चिमटा ‘घेत नीट वागण्याचा इशारा दिला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिजीतने ‘नवरीचा उखाणा’ असे कॅप्शन दिले आहे.काय होता नेहाचा उखाणा तुम्हीच पहा...

अभिजित खांडकेकर पोस्ट

 

View this post on Instagram

 

नवरीचा उखाणा #yaarkishadi #shardulnehha #pune #maharastrianwedding

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

 

Neha Pendse Marriage: अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या लग्नातील 'हे' खास क्षण नक्की पहा या फोटोंमधून Watch Video

नेहाचा लग्नसोहळा पुण्यात पार पडलाआहे. लग्नात नेहाने नऊवारी साडी नेसली होती. नेहा पेस्टल गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत खूपच शोभून दिसत आहे. तिने पारंपारिक महाराष्ट्रीयन लूकलाच पसंती दिली आहे. तिने घातलेली नथ आणि चंद्रकोर टिकली याच्यासह तिचा हा लुक अगदी परफेक्ट दिसत आहे. तर दुसरीकडे शार्दुलने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाची पगडी घातली आहे. काही दिवसांपूर्वी नेहाने तिच्या लग्नाआधीच्या विधिंचे फोटो शेअर केले होते.