Nehha Pendse Wedding Pictures: टेलिव्हिजन अभिनेत्री नेहा पेंडसे आणि शार्दुल सिंह यांचा विवाहसोहळा आज दणक्यात पार पडला आहे. रविवारी (5 जानेवारी) या जोडप्याने पुण्यात मराठमोळ्या पद्धतीने लग्न केले. या नवविवाहित जोडप्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. नेहा पेस्टल गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत खूपच शोभून दिसत आहे. तिने पारंपारिक महाराष्ट्रीयन लूकलाच पसंती दिली आहे. तिने घातलेली नथ आणि चंद्रकोर टिकली याच्यासह तिचा हा लुक अगदी परफेक्ट दिसत आहे. तर दुसरीकडे शार्दुलने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाची पगडी घातली आहे.
यापूर्वी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली की ती पारंपारिक नऊवारी साडीला स्वत: च ट्विस्ट देणार होती. “सहसा नऊवारीच्या साड्या रंगात चमकदार असतात आणि मराठमोळे पोशाख देखील चमकदार रंगांकरिता परिचित आहेत, परंतु मी काहीतरी वेगळंच करत आहे. मला असे वाटत नाही की बऱ्याच मराठमोळ्या नववधू पेस्टल कलर नऊवारी साडी नेसतात,” ती म्हणाली.
नेहा आणि शार्दूलच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका ग्रीन गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे तर शार्दूलने गुलाबी ब्लेझर आणि ग्रे ट्राऊझर्ससह निळा शर्ट परिधान केलेला दिसत आहे.
View this post on Instagram
आणि नेहा पेंडसे झाली शार्दूल सिंगसोबत #officiallyengaged💍 #nehapendse #nehawedsshardul
अभिनेत्री नेहा पेंडसे हिने लग्नसोहळ्यापूर्वी शेअर केला शार्दुल सोबतचा 'Special Moment' फोटो
यापूर्वी नेहाने शार्दूलसोबत तिच्या संगीत सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. रंगतदार पोशाखात हे कपल अगदी शोभून दिसत होते.