गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या लग्नसराईचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 2020 च्या सुरुवातीला हे लग्न होणार असे या फोटोवरुन दिसत होते. इन्स्टावरील तिच्या फॅनपेजवर तिचे लग्नाआधीचे ग्रहमुख विधींचे फोटो देखील शेअर करण्यात आले होते. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर नेहा पेंडसे ने आपल्या सोशल अकाउंटवरुन आपल्या होणा-या पतीसोबतचा लग्नाआधीचा लिपलॉक किस फोटो शेअर केला होता. त्यामुळे तिच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता आणखीनच वाढली होती. आज पु्हा नेहाने शार्दुल सिंह (Shardul Singh) सोबतचा आपल्या लग्नाआधीच्या काही क्षणांपूर्वीचा 'Special Moment' फोटो शेअर केला आहे.
या फोटोला तिने 'A little US before the big WE' असे कॅप्शन दिले आहे.
नेहा हिंदी बिग बॉस 12 ची स्पर्धक देखील राहिली होती. नेहा अनेक हिंदी , मराठी, दाक्षिणात्य चित्रपटात दिसली आहे. तसेच तिने मराठी अनेक आयटम साँगही केली आहेत.
IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना नेहा पेंडसे हिने "आपल्याला आपल्या स्वप्नातील राजकुमार मिळाला असून आपण एका नवीन कुटूंबात प्रवेश करणार आहोत, त्यामुळे आपण खूप आनंदी आहोत असे सांगितले आहे.