ग्लॅमरस मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे नववर्षात अडकणार लग्नाच्या बेडीत; विवाहाआधीच्या पारंपारिक विधींचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल
Neha Pendse Pre Wedding (Photo Credits: Instagram)

आपल्या मादक आणि हॉट अदांनी आपल्या चाहत्यांना घायाळ करणारी मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) पुढील वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा अलीकडे ऐकायला मिळत होत्या. त्या चर्चांना पूर्णविराम देत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या फॅन पेज वर तिचे प्री वेडिंग विधींचे म्हणजेच विवाहाआधीच्या पारंपारिक विधींचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्यासोबत तिची आईही बसलेली दिसत आहे. नेहा पेंडसे हा तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंह बयास याच्याशी लग्न करणार आहे. नेहा हिंदी बिग बॉस 12 ची स्पर्धक देखील राहिली होती.

तिच्या सोशल अकाउंटवरील फॅन पेजवर तिचे विवाह आधीच्या विधींचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात ती खूपच गोड आणि सुंदर दिसत आहे. लग्नाआधीच्या 'ग्रहपूजा' या विधीचे हे फोटो आहेत.

हेदेखील वाचा- ठरलं! नेहा पेंडसे जानेवारी मध्ये चढणार बोहल्यावर, बॉयफ्रेंड शार्दूल सिंह सोबत पुण्यात बांधणार लग्नगाठ

या फोटोत नेहा डोक्याला मुंडावळी बांधून आपल्या आईशेजारी बसलेली दिसत आहे. तिच्या फोटोवरून तिची लग्नाबद्दलची उत्सुकता आणि तिचा आनंद दिसून येत आहे.

Amitabh Bachchan यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान Watch Video 

IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना नेहा पेंडसे हिने "आपल्याला आपल्या स्वप्नातील राजकुमार मिळाला असून आपण एका नवीन कुटूंबात प्रवेश करणार आहोत, त्यामुळे आपण खूप आनंदी आहोत असे सांगितले आहे.