प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नेहा तिचा प्रियकर शार्दुल सिंह (Shardul Singh) सोबत येत्या वर्षात लग्न करणार असून अलीकडेच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला. काही दिवसांपूर्वी तिने आपण पुण्यात आपल्या जवळच्या लोकांमध्ये शार्दूलशी लग्न करणार आहोत अशी कबुली दिली होती, मात्र नेमका हा विवाह कधी होणार याबाबत तिने वाच्यता केली नव्हती, अलीकडे ही गुड न्यूज सांगून तिने आपल्या लग्नावर शिक्कामोर्तब केला. 5 जानेवारी 2020 रोजी पुण्यात नेहाचे लग्न पार पडेल. बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत नेहाने तिच्या लग्नाची तारीख सांगितली.
नेहा पेंडसे आहे मराठीतील सर्वात हॉट अँड ग्लॅमरस अभिनेत्री; हे फोटो आहेत पुरावा (See Photos)
लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडायचं की जवळच्या लोकांमध्येच पार पाडायचे हे ठरलं नव्हतं. पण अखेर शार्दुल आणि नेहाने अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याला पसंती दिली, असे समजत आहे. काही महिण्यापुर्वी तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. नेहाचे असंख्य फॅन्स यामुळे नाराज झाले होते ही बात वेगळीच मात्र तिचे फोटो पाहून अनेकांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
नेहा पेंडसे आणि शार्दूल सिंह
नेहा पेंडसे इंस्टाग्राम पोस्ट
दरम्यान नेहाचा बॉयफ्रेंड आणि होणार नवरा शार्दूल सिंह हा अमेरिकेत स्थित एक व्यासायिक आहे. सोशल मीडियावर प्रेमाची कबुली आल्यावर अनेकदा नेहाने शार्दुलच्या कुटुंबासोबतचे ही फोटो शेअर केले होते. तर करिअर मध्ये सध्या नेहाने ब्रेक घेतल्याचे दिसून येतेय, बिग बॉस नंतर तिला पुन्हा एकदा चांगली फेम मिळावी होती, यापूर्वी तिने अनेक मराठी, हिंदी, दाक्षिणात्य भाषांमधील सिनेमात काम केले आहे.