World Radio Day 2021 (PC - File Image)

World Radio Day 2021: दरवर्षी 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो. एक काळ असा होता की रेडिओ हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग होता. माहिती, संप्रेषण आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात असे. पण टेलिव्हिजन आणि मोबाईल यासारख्या वस्तूंच्या आगमनानंतर रेडिओ पूर्वीप्रमाणे वापरला जात नाही. परंतु, आजही रेडिओचे महत्त्व कमी झालेले नाही. जागितक रेडिओ दिनाच्या निमित्ताने त्यासंबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात...

माहितीच्या देवाणघेवाण आणि जगभरातील लोकांना शिक्षित करण्यासाठी रेडिओने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रेडिओ पत्रकारांसाठी एक व्यासपीठ असायचे, ज्याद्वारे ते आपला अहवाल जगाकडे पाठवून त्यांची कथा सांगत असतं. आजही रेडिओ हे माहिती पसरविण्याचे सर्वात शक्तिशाली आणि स्वस्त साधन आहे. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. पहिला जागतिक रेडिओ दिन औपचारिकपणे 2012 मध्ये साजरा करण्यात आला. (वाचा - Avinash Bhosales Son Amit Bhosale: बांधकाम व्यवसाययिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित इडीच्या ताब्यात; चौकशीसाठी पुण्याहून मुंबईला)

स्पॅनिश रेडिओ अकादमीने प्रथम 2010 मध्ये याचा प्रस्ताव दिला होता. 2011 मध्ये 13 फेब्रुवारी रोजी, जागतिक रेडिओ दिन युनेस्कोच्या महासभेच्या 36 व्या अधिवेशनात घोषित करण्यात आला. 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिन घोषित करण्यास संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 14 जानेवारी 2013 रोजी मान्यता दिली.

दरवर्षी युनेस्को जगभरातील प्रसारक, संस्था आणि समुदाय यांच्या संयुक्त विद्यमाने रेडिओ डेनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. या दिवशी संप्रेषणाचे माध्यम आणि जागरूकता पसरल्यामुळे रेडिओच्या महत्त्वाविषयी चर्चा आयोजित केली जाते. या विषयावर भाषण आयोजित केले जाते. या वर्षीच्या जागतिक रेडिओची थीम ही 'New World, New Radio' अशी आहे.