Anti-Valentine Week 2021फेब्रुवारी महिना हा जितका व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2021) या दिवसासाठी ओळखला जातो. तितकाच तो अँटी व्हॅलेंटाईन डे (Anti Valentine Day 2021) या आठवड्यासाठी देखील ओळखला जातो. व्हॅलेंटाईन डे च्या पाठोपाठ अँटी व्हॅलेंटाईन डे आठवडा (Anti Valentine's Day Week 2021) असतो. हा आठवडा देखील खूपच मजेशीर समजला जातो. व्हॅलेनटाईन डे जर एखाद्याचे सूत जुळले तर ते पुढे किती दिवस टिकते की त्याच्या विरुद्ध घडते हे पाहण्यासाठी हा आठवडा असतो. व्हॅलेंटाईन डे दिवशी अनेकांचे खरोखरंच खूप छान नाते जुळते तर काही ठिकाणी केवळ प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. अशा फसव्या प्रेमाचा खरा रंग या अँटी व्हॅलेंटाईन डे च्या आठवड्यात दिसतो.
हा अँटी व्हॅलेंटाईन डे आठवडा स्लॅप डे पासून सुरु होतो ज्याचा शेवट ब्रेकअप डे ने होतो. तसेच ज्या लोकांना या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनमध्ये इंटरेस्ट नसतो ते अँटी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात.हेदेखील वाचा- Anti- Valentine Week: ब्रेकअप नक्की का होतं, 'ही' असू शकतात महत्त्वाची कारणं
पाहूयात यंदा कधीपासून सुरु होतोय हा अँटी व्हॅलेंटाईन डे आठवडा, इथे पाहा पूर्ण वेळापत्रक
स्लॅप डे - 15 फेब्रुवारी 2021
किक डे - 16 फेब्रुवारी 2021
परफ्युम डे - 17 फेब्रुवारी 2021
फ्लर्टिंग डे - 18 फेब्रुवारी 2021
कन्फेशन डे - 19 फेब्रुवारी 2021
मिसिंग डे - 20 फेब्रुवारी 2021
ब्रेक अप डे - 21 फेब्रुवारी 2021
काय मग तुम्ही काय साजरा करणार आहात? व्हॅलेंटाईन डे की अँटी व्हॅलेंटाईन डे आठवडा.... तुमचाही जर व्हॅलेंटाईन डे दिवस साजरा करण्याचा विचार नसेल तर तुम्ही हा अँटी व्हॅलेंटाईन डे सारखा मजेशीर आठवडा नक्कीच साजरा करू शकता.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे प्रेमाची भावना आणि व्याख्या सुद्धा बदलली आहे. तर नात्यामधील प्रेम हे कुठेतरी हरवले असल्याची जाणीव बहुतांश जणांना होते.त्यामधून एकमकेकांमध्ये भांडण, निराशा अशा गोष्टी आपल्या वाटेला येतात. पण अॅन्टी व्हॅलेनटाईन हा एखाद्याचा सूड घेण्यासाठी नव्हे तर एका मजेशीर पद्धतीने साजरा करायला हवा.