Reasons For Break Up (Photo Credits: Pixabay)

फेब्रुवारी महिन्यातील प्रेमाचे दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन वीक संपताच सुरु अँटी व्हॅलेंटाईन वीक (Anti Valentine Week ) , या वीक मधील एक मुख्य आणि  शेवटचा दिवस असतो 21 फेब्रुवारी म्हणजेच ब्रेक अप डे (Break up Day). अनेकदा खूप सुरळीत सुरु असणाऱ्या नात्यात अचानक अडचणी येऊन आतापर्यंत तो/ ती माझ्यावर किती प्रेम करतो या वाक्याचा काही क्षणात त्याच/ तिचं माझ्यावर प्रेमच उरलेलं नाही इथवर प्रवास होतो. या समस्या काहींच्या बाबतीत अगदी सामान्य असून थोडं बोलून, समजून, एकमेकांसोबत वेळ घालवून सोडवता येतात तर ज्या ठिकाणी असं करणं शक्य नसत तिथे कपल्स एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतात. लग्नासारख्या अधिकृत कायदेशीर नात्यात तुम्ही अडकले असाल तर घटस्फोट जसा घेतला जातो तसाच प्रेमाच्या नात्यात ब्रेक अप केला जातो. पण कधीकाळी ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करत असतो त्यांच्यापासूनच एवढा मोठा निर्णय का घेतला जात असेल हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? अर्थात हा निर्णय काही एका छोट्या विचारावर आधारित नसतो तर वागणुकीत झालेले, बदल कधीतरी उशिराने बाहेर आलेले तुमचे पैलू हे सर्व मुद्दे या ब्रेकअप ला कारण ठरतात. यातील काही सर्वसामान्य मुद्दे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग..

1) टोमणे मारणं

अनेकदा टोमणे मारून आपण आपल्या पार्टनरला जास्त न हर्ट करता कसं आडमार्गाने सुनावता येईल असा प्रयत्न करत असतो, मात्र ही गोष्ट तुमच्यावरच उलटी पडू शकते. सतत टोमणे मारल्याने समोरच्याला दुखावून तो व्यक्ती कदाचित तुमच्यापासून कायमचा लांब होऊ शकतो, यात आणखीन धोक्याची गोष्ट अशी कि तुमच्या टोमण्याचा अर्थच जर समोरच्या व्यक्तीला कळला नाही तर अर्थाचा अनर्थ होण्याची पूर्ण शक्यता असते, असे होऊ द्यायचे नसेल तर अगदी थेट बोलणे निवडा.

2) जुनी भांडण उकरून काढणे

तुमच्या जोडीदाराने भूतकाळात अशा काही चुका केल्या असतील ज्या करणं योग्य नव्हतं. पण सतत जोडीदाराला त्याच त्याच गोष्टींनी टोचत राहणं हे तुमच्या नात्यासाठी खूपच त्रासदायक ठरू शकतं. सतत तुम्ही या चुकांबद्दल जोडीदाराला बोलर राहिलात तर त्याला हे नक्कीच आवडणार नाही आणि एखाद्या दिवशी त्याच्या सहनशक्तीचा बांध फुटून तुमच्यापासून दूर निघून जाईल. आपला पार्टनर आपली फसवणूक करत आहे हे कसं समजेल? जाणून घ्या 'ही' काही लक्षणं

3) तुलना करणं

अनेकदा बोलताना माझ्या मैत्रणीचा बॉयफ्रेंड बघ किती छान वागतो, किंवा याच्यापेक्षा तर माझा एक्सचं चांगला वागायचं असं तुम्ही बोलून जात असाल तर आताच तुमच्या सवयीला वळण लावा कारण तुलना करणं हे कोणत्याच नात्यासाठी योग्य नाही. जो तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागेल हे तुम्ही त्या व्यक्तीला संबोधून बोला, इराणमधील आवडते गुण सांगताना ही आपल्याकडून तुलना होत नाही याची काळजी घ्या.

4) खोटं बोलणं/ अति खरं बोलणं

तुम्ही जेव्हा तुमच्या पार्टनर पासून गोष्टी लपवू लागता तेव्हा तुमच्या नात्यात आपसूकच फूट पडते, पण हीच गोष्ट उलट पद्धतीने ही काम करते म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर समोर एकदम सर्व काही सांगून मोकळे होता तेव्हा तुमच्याकडे नवीन काय हा बघण्याचा दृष्टिकोन होतो. त्यामुळे ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या कधीही लपवू नका मात्र काही पत्ते हळू हळू खोला

5) संवाद कमी किंवा जास्त होणं

असं म्हणतात कोणतीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर गेली की तिचा वीट येऊ लागतो. असाच मुद्दा संवादाच्या बाबतीत होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पार्टनरशी अजिबात बोलला नाहीत तर येणारी दुरावा किंवा सतत बोलत राहिलात तर येणारा कंटाळा दोन्ही गोष्टी करणे टाळा.

लक्षात घ्या, कोणत्याही नात्यात जर का तुम्हाला मानसिक आनंद मिळत नसेल तर त्यापासून लांब होणे हे केव्हाही रास्त आहे, अनेकदा ब्रेक अप सारखया मुद्द्यांकडे चार चौघात वावरताना वाईट म्ह्णून पहिले जाते पण एकाअर्थी ही स्वतःवर असणाऱ्या प्रेमापोटी आपल्यासाठी योग्य नसलेल्या व्यक्तीला लांब करण्याची पद्धत आहे आणि Friends Self Love Is First! बरोबर ना?