आपला पार्टनर आपली फसवणूक करत आहे हे कसं समजेल? जाणून घ्या 'ही' काही लक्षणं
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

आपण अनेकदा प्रेमामध्ये फसवणूक झाल्याचे प्रसंग ऐकले असतील. अनेकांनी ते अनुभवले देखील असतील. तुम्हीही जर रिलेशनशिप मध्ये असाल तरी काही बाबी नक्की ध्यानात ठेवा. तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत तर नाही ना याची सर्वात आधी खात्री करून घ्या. आणि ही खात्री नक्की कशी करायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर खाली दिलेले मुद्दे नीट वाचा. कारण जर तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत असेल तर लक्षणं तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये सहज दिसतील. त्यामुळे जरा सावध राहा आणि स्वतःची फसवणूक होण्यापासून स्वतःचा बचाव करा.

सर्वात मुख्य बाब म्हणजे जर तुमच्या पार्टनरने त्याच्या किंवा तिच्या एक्स पार्टनरला धोका दिला असेल तर तुम्हालाही धोका मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या पार्टनरच्या भूतकाळाची नीट माहिती घ्या.  तुमच्या पार्टनरने एक्स सोबत का ब्रेक अप केले याचे कारण जरूर शोधा.

तुमचा पार्टनर तुमच्या इमोशनली अटॅच आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण, काही लोक रिलेशनमध्ये असले तरी भावनिक दृष्ट्या समोरच्याशी तितके अटॅच होत नाहीत. आणि अशा व्यक्तींना ब्रेकअप नंतर देखील तितकासा फरक पडत नाही.

तुमचा पार्टनर सतत मोबाईल वापरतो का याची खात्री करून घ्या. कारण जर तुम्ही एकत्र असाल आणि तुमचा पार्टनर तुमच्याशी गप्पा मान्य ऐवजी मोबाईल वापरात असेल तर त्याचे कारण शोधा.

क्रश असलेल्या व्यक्तीच्या मनातील गुपित समजुन घेण्यासाठी 'या' युक्तीचा वापर करा

तुमचा पार्टनर जर तुम्हाला त्याच्या किंवा तिच्या सर्कलमधील व्यक्तींना भेटवत नसेल तर त्याचे कारण रोखठोकपणे विचारा. कारण तुम्ही तुमच्या पार्टनरच्या जवळच्या व्यक्तींना ओळखणं महत्त्वाचं आहे.