16 डिसेंबर हा भारतासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी 1971 साली भारतीय सैन्याने पाकिस्तान लष्कराला धूळ चारली होती. अवघ्या 13 दिवसांच्या युद्धात पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली होती. 47 वर्षानंतरही, भारत हा दिवस 'विजय दिवस' (Vijay Diwas) म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो. पण हे सामान्य युद्ध नव्हते. या युद्धाने जगाच्या राजकीय नकाशामध्ये मोठा बदल घडवून आणला व त्याच्या जखमा अजूनही पाकिस्तानला सलत आहे. त्यावेळी भारताने सुमारे 1 लाख युद्धकैद्यांना ताब्यात घेतले होते आणि महत्वाचे म्हणजे बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते, यानंतर बांगलादेश या नव्या देशाची स्थापना झाली.
पूर्व पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्याचा लढा चालू असताना 3 डिसेंबर 1971 रोजी हे युद्ध सुरू झाले होते. 13 दिवसांनंतर 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याच्या बिनशर्त आत्मसमर्पणानंतर हे युद्ध संपले. या युद्धात सुमारे 3,900 भारतीय सैनिक शहीद झाले, तर 9,851 जखमी झाले होते. तर अशा या विजय दिवसाचे औचित्य साधून Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून करा सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना सलाम
16 डिसेंबर 1971 विजय दिवसानिमित्त, भारतीय सेनेच्या जवानांना सलाम!
16 डिसेंबर 1971
विजय दिवस
भारतीय सेनेच्या सर्व जवानांना कोटी कोटी प्रणाम!
खरा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल,
पण आपल्या मातृभूमीचा अन्याय सहन करणार नाही.
भारतीय सेनेच्या जवानांना कोटी कोटी प्रणाम!
खरे सैनिक समोरच्या शत्रूचा द्वेष करतो म्हणून कधीच लढत नाहीत,
ते लढतात कारण त्यांच्या पाठीमागे असलेल्या लोकांवर ते प्रेम करतात
भारतीय सेनेच्या सर्व जवानांना कोटी कोटी प्रणाम!
हवेच्या झोताने आमचा ध्वज हलत नाही,
तर तो हलतो प्रत्येक सैनिकाच्या शेवटपर्यंतच्या श्वासाने,
जो त्याच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करतो
16 डिसेंबर 1971 विजय दिवस
भारतीय सेनेच्या जवानांना सलाम!
धरतीचा पुत्र तो, सीमेवर होते गाव
'वंदे मातरम' कोरले होते त्याच्या छातीवर नाव
16 डिसेंबर 1971 विजय दिवसाच्या शुभेच्छा!
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे पूर्व पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु होते. बांगलादेशातून जवळपास 1 कोटी लोक आश्रयासाठी भारतात आले होते. जर असेच सुरु राहिले असते तर भारतात असंतोष वाढला असता, त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना युद्धाचा निर्णय घ्यावा लागला. 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हवाई दलाच्या 11 तळांवर हल्ले केले आणि युद्धाला तोंड फुटले. मात्र अवघ्या 13 दिवसांत भारतीय सैन्याने पाकिस्तानला पळता भुई थोडी केली. (हेही वाचा: Savitri Utsav: महाराष्ट्रात दरवर्षी 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती 'सावित्री उत्सव' म्हणून साजरी होणार)
पुढे 2 जुलै 1972 रोजी भारत-पाकिस्तानने सिमला करारावर स्वाक्षरी केली आणि पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांसाठी बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली व त्यानंतर जगाच्या नकाशावर अजून एक देश अस्तित्वात आला.