Govatsa Dwadashi 2020: अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसू बारस (Vasu Baras). या दिवशी गाय-वासरांची पूजा करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केला जातो. कृषीप्रधान भारतामध्ये घरातील दूध दुभत्या जनावरांची पूजा करण्याची प्रथा आहे. बैलपोळ्याला जशी बैलांना पूजा करून आदर व्यक्त केला तसेच वसू बारसेच्या दिवशी गायीचं पूजन केलं जातं. या दिवशी गाय -वासरू यांची पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे. पण मुंबई, पुण्यात किंवा ग्रामीण भागातही आज अनेक ठिकाणी घरांमध्ये गाय-वारसं नाहीत. त्यांनी हा गोवत्स द्वादशी (Govatsa Dwadashi) किंवा वसूबारसेच दिवस कसा साजरा करावा? हा प्र्श्न तुमच्या मनात आला असेल तर जाणून घ्या त्याचं उत्तरं. Vasu Baras 2020 Messages: वसुबारस च्या Images, SMS, Wishes, शेअर करत साजरा करा दिवाळीचा पहिला दिवस.
समुद्रमंथनातून 5 कामधेनू गायी आल्या . त्यापैकी नंदा या कामधेनूच्या आराधनेसाठी वसू बारस हा सण असतो. या सणाच्या निमित्ताने पशू-प्राण्यांप्रती कृतज्ञता देखील प्रकट होऊ लागली. दरम्यान हिंदू पुराणानुसार विष्णू लोकातून गायी आल्याने तिच्या अंगावर असलेल्या केसांच्या संख्येइतके वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनेतून गायीची पूजा केली जाते. गायीच्या शरीरात 33 कोटी देवदेवतांचा वास असल्याची श्रद्धा असल्याने या दिवसानिमित्त गायीची पूजा करून दिवाळीचा सण सुरू केला जातो.
गोवत्स द्वादशी कशी साजरी कराल?
गोवत्स द्वादशी म्हणजेच वसूबारस दिवशी तुमच्या कडे गाय नसेल तर पाटावर गायीचं चित्र काढून किंवा तांदळाने गाय साकरून देखील वसू बारसेच्या संध्याकाळी तिची पूजा केली जाते. यादिवशी काही जण दिवशी दिवसभर उपवास करून वसूबारस साजरी केली जाते. तसेच दिवसभर दूध -दूधाचे पदार्थ टाळले जातात.
दरम्यान यंदा कोरोना वायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सण हे अत्यंत साजरे पणाने आणि घरात राहूनच जवळच्या मित्र मंडळींमध्ये साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थंडीचा काळ आणि सणासुदीमुळे अगदी मोठी गर्दी केल्यास पुन्हा कोरोनाचा भडका उडू शकतो त्यामुळे या सणाच्या निमित्ताने अनावश्यक बाहेर पडणं टाळा.
(टीप: वरील आर्टिकल केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहले आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली पुष्टी करत नाही. धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा अंधश्रद्धा पसवण्याचा आमचा हेतू नाही.)