
Vasu Baras 2020 Messages: दिवाळीच्या (Diwali 2020) सुरुवातीला येणारा वसुबारस (Vasu Baras) हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गायीची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. काही ठिकाणी वसुबारसच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे यासाठी ही पूजा केली जाते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे देशभरात पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्याप्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. या दिवशी बळीराजाला Images, SMS, Wishes, शेअर करत खास शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा -Laxmi Pujan 2020 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)
आज वसु बारस
दिवाळीचा पहिला दिवस,
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
वसू बारसच्या खूप खूप शुभेच्छा!

गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी
आणि भरभराटीची जावो.
वसूबारसच्या शुभेच्छा!

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
परमपुज्य जी वंद्य या भारताला
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची...
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!

गोवत्स द्वादशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

वसुबारसच्या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी विवाहित स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालतात. गायीचे औक्षण करत हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून त्यांना नमस्कार करतात. त्यानंतर गायीला गोड नैवैद्य दाखवला जातो.